माणुसकी फाउंडेशनच्या महिला जिल्हाध्यक्षपदी सायली महाजन...
माणुसकी फाउंडेशनच्या महिला जिल्हाध्यक्षपदी सायली महाजन...
माणुसकी मल्टीपर्पज फाउंडेशन महाराष्ट्र राज्यच्या जळगाव जिल्हा महिला जिल्हाध्यक्षपदी कु. सायली महाजन यांची निवड झाली आहे. मूळच्या खडका तालुका भुसावळ येथील रहिवासी असलेल्या कु. सायली गणेश महाजन या नेहमीच सामाजिक क्षेत्रात कार्यरत असता. त्या क्षत्रिय मराठा फाउंडेशन सोशल मीडियाच्या जळगाव जिल्हा प्रमुख, अखिल भारतीय लेवा विकास महासंघ, विद्याथी संघटना, जळगावच्या युवती प्रमुख व नॅशनल युथ कौन्सिल ऑफ इंडियाच्या भुसावळ तालुका सचिव आहेत. त्यांच्या या साजिक कार्याची दाखल घेत संस्थेचे अध्यक्ष विवेक राजापुरे यांनी त्यांची हि नियुक्ती केली आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य, महिला सक्षमीकरण, शैक्षणिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक, विकासात्मक व देश सेवेच्या कार्यात नेहमी अग्रेसर राहणार असल्याचे कु. सायली यांनी यावेळी सांगितले. त्यांची हि सर्व सामाजिक कार्ये आई रेखाताई महाजन, काका व खडका येथील माजी सरपंच भैया
महाजन, कमलाकर महाजन, शंकर महाजन तसेच सर्व मित्र परिवार यांच्या सहकार्याने व जबाबदारीने योग्यरीत्या पार पडणार असेही त्यांनी सांगितले. फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक बांधिलकीचे कार्य करत रहावे तसेच जात, धर्म, पंथ विसरून माणुसकीचे कार्य करून देशाच्या प्रगतीसाठी समाज जागृतीचे कार्य करावे अशी अपेक्षा संस्थेने व्यक्त केली आहे.
Comments
Post a Comment