सामाजिक कार्यकर्त्या श्वेता सीमा विनोद पाटील यांना उद्या मिळणार यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार २०२५-२६

सामाजिक कार्यकर्त्या श्वेता सीमा विनोद पाटील यांना उद्या मिळणार यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार २०२५-२६
पिंपळगाव प्रतिनिधी :-दिपक मुलमुले(पाटील)

पिंपळगाव हरे येथील सामाजिक कार्यकर्त्या श्वेता सीमा विनोद पाटील यांना विविध सामाजिक, शैक्षणिक व जनहिताच्या कार्याची दखल घेत 'यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार २०२५-२६' प्रदान करण्यात येणार आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्यात साहित्य व युवा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असून, पुरस्कारार्थी म्हणून श्वेता सीमा विनोद पाटील यांचा सन्मान करण्यात येईल.
हा पुरस्कार खासदार सुप्रिया सुळे, कार्याध्यक्ष, यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असून हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे.
श्वेता सीमा विनोद पाटील यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी सर्व स्तरातून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..