स्पेलिंग बी स्पर्धेत जि. प प्राथमिक शाळा भोजेच्या विद्यार्थ्यांचे केंद्रस्तरावर घवघवीत यश.
स्पेलिंग बी स्पर्धेत जि. प प्राथमिक शाळा भोजेच्या विद्यार्थ्यांचे केंद्रस्तरावर घवघवीत यश.
शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली स्पेलिंग बी स्पर्धा प्रथम शाळास्तरावर घेण्यात आली. त्यानंतर दिनांक ४ सप्टेंबर २०२६ रोजी पिंपळगाव येथे केंद्रस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. केंद्रप्रमुख मा. सखाराम महाजन तसेच केंद्रातील ज्येष्ठ शिक्षक यांच्या अध्यक्षतेखाली ही स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
या स्पर्धेत केंद्रातील सर्व शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. चुरशीच्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विचारण्यात आलेल्या विविध इंग्रजी शब्दांच्या स्पेलिंग अचूकपणे सांगत आपल्या ज्ञानाचे आणि तयारीचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.
भोजे शाळेतील विद्यार्थ्यांनीही या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत विविध गटांत प्रथम क्रमांक पटकावला.
पहिला गट – स्वदीप दीपक जाधव – प्रथम क्रमांक
दुसरा गट – वैधवी दिलीप पवार – प्रथम क्रमांक
तिसरा गट – वैष्णवी जितेंद्र उबाळे व माधवी अरुण चौथे – प्रथम क्रमांक
चौथा गट – सायना – प्रथम क्रमांक
चारही गटांमध्ये भोजे शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेतील शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांकडून त्यांचे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.
या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची तयारी सर्व वर्गशिक्षकांनी मेहनत घेऊन करून घेतली. विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रप्रमुख तसेच मुख्याध्यापक यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. शिक्षकांच्या मार्गदर्शनासोबतच विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमामुळे हे यश संपादन करता आले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे सर्वच क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment