पाचोरा महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचे समुपदेशन...
पाचोरा महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचे समुपदेशन
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचालित श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा येथे दि: 24 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी शिक्षण विभाग व कनिष्ठ महाविद्यालय समुपदेशन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संबोधनात प्रा श्रीमती जयश्री वर्मा - वाघ यांनी मालेगाव लैंगिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना पोस्टर दाखवून पोक्सो कायद्याची सखोल माहिती दिली. या संबोधनात महाविद्यालयाच्या वतीने पीडित यज्ञा बाळाला भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.
सदर संबोधनाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिरीष पाटील हे होते. कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक डॉ जे पी बडगुजर यांनी संबोधनाचे प्रास्ताविक केले. संबोधनाचे सूत्रसंचालन प्रा डॉ अतुल सूर्यवंशी यांनी केले तर प्रा कविता महाजन यांनी आभार मानले. प्रा डॉ सुनिता गुंजाळ यांनीही विद्यार्थ्यांना कायद्याचे समायोचीत मार्गदर्शन केले.
शिक्षण विभाग व पाचोरा महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या संशोधनात वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा डॉ वासुदेव वले, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा एस एस पाटील, पर्यवेक्षक डॉ जे पी बडगुजर, IQAC समन्वयक प्रा डॉ शरद पाटील, प्रा डॉ कमलाकर इंगळे, प्रा वळवी, वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू-भगिनी तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू-भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर संबोधनाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.
Comments
Post a Comment