छत्रपती संभाजी नगर येथे ७५ शाळांचा रायन मिनाथॉनमध्ये सहभाग.


छत्रपती संभाजी नगर येथे ७५ शाळांचा  रायन मिनाथॉनमध्ये सहभाग. 
छत्रपती संभाजीनगर: रायन इंटरनॅशनल स्कूलतर्फे आयोजित बहुप्रतिक्षित 'रायन मिनाथॉन' स्पर्धेचा समारोप नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बिडकीन येथील ७५ हून अधिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
शाळेचे अध्यक्ष डॉ. ए. एफ. पिंटो आणि व्यवस्थापकीय संचालक ग्रेस पिंटो यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकारण्यात आली होती. 'शांतीसाठी धावा' या संकल्पनेवर आधारित असलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तव आणि प्रार्थनेने झाली. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य, निरोगी जीवनशैली आणि क्रीडा भावना रुजवणे हा या आयोजनामागील मुख्य उद्देश होता.
या स्पर्धेत वयोगटानुसार निरनिराळ्या अंतराच्या शर्यती आयोजित केल्या होत्या:
 * U-12 मुलगे: ३ किमी
 * U-12 मुली: २ किमी
 * U-14 मुलगे: ३ किमी
 * U-14 मुली: ३ किमी
 * U-16 मुलगे: ४ किमी
 * U-16 मुली: ३ किमी
स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत बिडकीन येथील 'डिव्हाईन चाइल्ड कॉन्व्हेंट' शाळेने सर्वसाधारण चॅम्पियनशिप (General Championship) पटकावली. छत्रपती संभाजीनगर येथील शाळेने प्रथम उपविजेतेपद, तर जालन्यातील सेंट जॉन्स हायस्कूलने द्वितीय उपविजेतेपद मिळवले.
प्रत्येक गटातील विजेत्यांना रोख पारितोषिक, पदक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह डॉ. दैनिक प्रसारचे संपादक कनिप अन्नपूर्णे, सरपंच सुनील खरात, दामिनी पाठक, कांचन मिरधे, लता जाधव, डॉ. किरण ठाकरे, डॉ. विजय निकम, डॉ.न्यूट्रिशन कोच अनघा पाटील ,वेलनेस कोच प्रतिभा पाटिल आणि फिटनेस ट्रेनर शितल हजारे आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..

​पिंपळगाव हरेश्वर येथील 'दि लॉर्ड इंग्लिश मीडियम स्कूल'मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू!