“प्रा. सौ जयश्रीताई वर्मा वाघ यांची सकारात्मक ऊर्जा व तणावमुक्त जीवनशैली : विशेष मुलाखत उद्या 2 फेब्रुवारी 2026 रोजी आकाशवाणीच्या newsonair या अँपवर”

“प्रा. सौ जयश्रीताई वर्मा वाघ यांची सकारात्मक ऊर्जा व तणावमुक्त जीवनशैली : विशेष मुलाखत उद्या 2 फेब्रुवारी 2026 रोजी आकाशवाणीच्या newsonair या अँपवर”

ज्ञान, साधना, कला आणि संवेदनशीलतेचा सुंदर संगम म्हणजे प्रा. सौ. जयश्रीताई वर्मा वाघ मॅडम.
श्री सेठ मुरलीधरजी मानसिंगका कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा येथील वाणिज्य विभागाच्या प्राध्यापिका असलेल्या प्रा. सौ जयश्रीताई वर्मा वाघ मॅडम यांची सकारात्मक ऊर्जा, मानसिक संतुलन व तणावमुक्त जीवनशैली या विषयावर विशेष मुलाखत दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९:३० वाजता ‘newsonair’ अ‍ॅपवर जळगाव आकाशवाणीवर प्रसारित होणार असून, ही मुलाखत श्रोत्यांसाठी जणू नवसंजीवनीच ठरेल.
ही मुलाखत जळगाव आकाशवाणीच्या निवेदिका सौ. वैदेही नाखरे मॅडम यांनी अतिशय प्रभावीपणे घेतली आहे.

प्रा. सौ जयश्रीताई वर्मा वाघ मॅडम म्हणजे एका व्यक्तीत साकारलेले अनेक गुणांचे इंद्रधनुष्य 
त्या केवळ प्राध्यापिका नाहीत, तर
1) रेकी आचार्य
2) योग शिक्षिका
3)भारतीय लोकनृत्य व बेसिक क्लासिकल डान्समध्ये टॉपर
4) फाइन आर्ट्स टॉपर
5) कॅरम गोल्ड मेडलिस्ट
6) क्रिकेट व बेसबॉल खेळाडू
7) कराटे ग्रीन बेल्ट प्लेअर
8) गायिका 
 9)प्रभावी वक्त्या (स्पीकर)
10)सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांना शिकवण्याचा अनुभव असलेल्या मार्गदर्शिका
11) फिनिक्स अकॅडमी, पाचोरा यांच्या संचालिका
 12)वर्षांचा अध्यापन अनुभव असलेल्या अनुभवी शिक्षिका
13) ‘होप’ प्रकल्पाच्या प्रमुख
14) पालक-विद्यार्थी-शिक्षक समुपदेशक
15) संशोधक विद्यार्थिनी

अशा असंख्य कलागुणांनी त्या केवळ संपन्न नाहीत, तर आपल्या गुणांचा समाजहितासाठी उपयोग करणाऱ्या कर्मयोगिनी आहेत.

असं म्हटलं जातं की, संस्कारांची पहिली शाळा म्हणजे ज्या घरात आपण जन्म घेतो ते  कुटुंब आणि प्रा. सौ जयश्रीताई वर्मा वाघ मॅडम यांच्या आयुष्यात ही म्हण अक्षरशः साकार झालेली दिसते.

ब्रिटिश स्वातंत्र्य सेनानी असलेले  आजोबा भवरलालजी वर्मा यांच्याकडून देशभक्तीचे संस्कार घेतले, तर
आजी सरस्वती देवी भवरलालजी वर्मा कडून सनातन संस्कृतिचे संस्कार अंगीकारले,

वडील ओमप्रकाशजी वर्मा (जिल्हा न्यायाधीश) यांच्याकडून त्यांनी न्याय, शिस्त व प्रामाणिक पणाची शिकवण घेतले,

आई किरणदेवी वर्मा गर्भापासूनच प्रा. सौ जयश्रीताई वर्मा वाघ मॅडम यांच्यावर संस्कारांची बीज रोवणाऱ्या संस्कारमूर्ती

बहीण गायत्री वर्मा (जिल्हा न्यायाधीश)
 व श्रद्धा वर्मा (युवा वैज्ञानिक) यांच्याकडून त्यांनी कार्यकर्तृत्वाची प्रेरणा घेतली,

भाऊ-वहिनी म्हणजे  आनंद वर्मा व जया वर्मा (आंतरराष्ट्रीय कंपनीतील व्यवस्थापक) यांच्याकडून त्यांनी आधुनिक दृष्टिकोन घेतला

अशा क्रांतिकारी, सुशिक्षित व संस्कारसंपन्न परिवारात त्यांचे जन्म घेऊन त्यांचे व्यक्तिमत्त्व घडले.
      तसेच 
पाचोरा तालुक्याचे माजी आमदार ओंकारआप्पा नारायण वाघ व लक्ष्मीबाई ओंकारआप्पा वाघ यांच्या त्या नातसून,
बांबरुडचे माजी सरपंच व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी व्यवस्थापक मधुकर ओंकारआप्पा वाघ आणि गोसे हायस्कूल, पाचोरा येथील माजी मुख्याध्यापिका सौ प्रमिलाताई मधुकर वाघ यांच्या त्या सून,
आणि कोमल मधुकर वाघ यांच्या त्या अर्धांगिनी आहेत.
तसेच विधान व लक्ष्मी यांच्या त्या प्रेमळ आई आहेत. प्रा. सौ
जयश्रीताई वर्मा वाघ मॅडम यांच्या कर्तृत्वामागे जितके त्यांचे अथक परिश्रम आहेत, तितकेच मोलाचे योगदान त्यांच्या संस्कारसंपन्न मुलांचेही आहे. त्यांची मुलं वयाने जरी कोवळी असली, तरी समजूतदारपणाने ही मुलं खूप मोठी आहेत. आपली आई वर्किंग वुमन आहे आणि आपल्यासाठी अहोरात्र धडपड करत आहे याची जाणीव त्यांच्या मनात खोलवर रुजलेली आहे.
आजच्या धकाधकीच्या जीवनात त्यामुळेच प्रा.सौ जयश्रीताई वर्मा वाघ मॅडम यांच्या आयुष्यात कर्तृत्व, कुटुंब आणि करुणा यांचा सुंदर समतोल साधला गेला आहे.
ज्ञानाचा दीप, संस्कारांची शिदोरी आणि सेवाभावाची ज्योत अशी प्रा. सौ. जयश्रीताई वर्मा वाघ मॅडम यांची ओळख आहे. त्या केवळ शिकवत नाहीत, तर घडवतात; केवळ बोलत नाहीत, तर प्रेरणा देतात; आणि केवळ यशस्वी नाहीत, तर इतरांच्या आयुष्यात यशाची वाट उजळवतात.
अशा या बहुआयामी, तेजस्वी व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वास मनःपूर्वक सलाम 
आणि त्यांच्या कार्याला उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा

Comments

Popular posts from this blog

चिकन, मटण शॉप, कत्तलखाने बंद; गॊमांस कत्तल व विक्री करत असतांना आढळ्यास होणार कार्यवाही, पिंपळगाव पोलीस स्टेशन तर्फे मोठा निर्णय.

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.