मनुमाता नगरात रस्ता ‘चोरी’ — गावभर चर्चेला उधाण!

मनुमाता नगरात रस्ता ‘चोरी’ — गावभर चर्चेला उधाण!

पिंपळगाव हरेश्वर –मनुमाता नगरात , वार्ड क्रमांक ३ मध्ये गेल्या काही दिवसांपासून एक प्रसिद्ध कुजबुज कानावर पडतेय— *रस्ता चोरीला गेला आहे! होय, हे चुकून लिहिलं गेलं नाहीये. काँक्रीटचा रस्ता मंजूर झाल्याचं कॉलनीतील लोक सांगतात… पण रस्ता बांधला काही गेला नाही.
म्हणजे मंजुरी कागदावर, आणि प्रत्यक्षात… शून्य किलोमीटरचा काँक्रिटचा शानदार रस्ता!

या ‘चोरलेल्या रस्त्या’ची बातमी गावभर पसरताच पिंपळगाव हरेश्वरात एकाचवेळी गंभीर चर्चा आणि कडवट हशा सुरू आहे. 

कॉलनीतील नागरिकांनी आता ठरवलंय —
" आमचा काँक्रिटचा रस्ता कोणी चोरला ते शोधायचं, प्रशासनाला जाब विचारायचा, आणि गरज पडली तर आंदोलन करायचंच!"

दरम्यान, रस्त्याअभावी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांची रोज तारेवरची कसरत सुरूच आहे. 

कॉलनीतील लोकांचा सवाल अगदी थेट आहे —
“आम्ही मतदान करतो, आम्ही गावचेच नागरिक आहोत… मग आमच्या रस्त्याकडे ग्रामपंचायतीचं लक्ष नेमकं कधी वळणार?”

आता रस्ता कोणी ‘चोरला’, तो ‘कुठे लपवला’, आणि तो ‘परत मिळेल का’ — याचे उत्तर प्रशासन देणार का, की नागरिकांना पुन्हा आंदोलनाचाच मार्ग घ्यावा लागणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..