पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.


पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद  साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

 काँग्रेस पूर्ण ताकदीने लढणार,काँग्रेस स्थापना दिनानिमित्त पिंपळगाव हरेश्वर येथे निर्धार.

काँग्रेस पक्ष पाचोरा तालुक्यात आगामी निवडणुका पूर्ण ताकदीने लढणार असून संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे राज्य सरचिटणीस ॲड. भाऊसाहेब आजबे यांनी केले. पिंपळगाव हरेश्वर येथे काँग्रेस स्थापना दिनाच्या निमित्ताने २७ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित चर्चा व स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एनएसयूआयच्या महासचिव श्रीमती श्वेता सीमा विनोद पाटील यांच्या उमेदवारीस काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा राहील, अशी अधिकृत घोषणा ॲड. आजबे यांनी केली. त्यांच्या विजयासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कटिबद्ध प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सोमवंशी यांनी सत्ताधारी सरकारवर टीका करताना, काँग्रेस सरकारने सुरू केलेल्या लोकहिताच्या योजनांची केवळ नावे बदलून सरकार श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. योजनांचा प्रत्यक्ष लाभ सामान्य जनतेपर्यंत पोहोचवून विकासाचे राजकारण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात मनरेगाचे नाव बदलून तसेच नव्या धोरणांद्वारे ग्रामीण रोजगाराच्या संधी कमी केल्या जात असल्याच्या निषेधार्थ ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. ग्रामीण भागातील रोजगार व विकासासाठी काँग्रेस ठामपणे लढा देईल, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमास शरिफ हाजी कादर खाटीक (जिल्हा उपाध्यक्ष), राजेंद्र विश्वनाथ महाजन (जिल्हा सचिव), प्रताप दादा पाटील (जिल्हा सरचिटणीस), अनिताताई पवार (माजी सभापती), संगीता नेवे (महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष), प्रकाश विठ्ठलराव चव्हाण (तालुका उपाध्यक्ष) यांच्यासह सुमारे ५० ते ६० स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काँग्रेस स्थापनेच्या दिवसानिमित्त पक्षाची मूल्ये, लोकशाही आणि सामाजिक न्याय यांचा संदेश पुन्हा एकदा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार या कार्यक्रमातून व्यक्त करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

चिकन, मटण शॉप, कत्तलखाने बंद; गॊमांस कत्तल व विक्री करत असतांना आढळ्यास होणार कार्यवाही, पिंपळगाव पोलीस स्टेशन तर्फे मोठा निर्णय.

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.