शासकीय ITI पाचोरा येथील कु.चेतना हिरे हिचे वक्तृत्व स्पर्धेत यश...

शासकीय ITI पाचोरा येथील कु. चेतना हिरे हिचे वक्तृत्व स्पर्धेत यश...

शेठ नारायण बंकट वाचनालय, चाळीसगाव यांच्या वतीने 28 सप्टेंबर सोमवार रोजी आयोजित करण्यात आलेल्या स्व. प्रा. सौ. मंदाताई व स्व. डॉ. शामकांत वा. स्मृती करंडक आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), पाचोरा येथील COPA ट्रेडची विद्यार्थिनी कु. चेतना रणदीप हिरे हिने उल्लेखनीय यश संपादन केले.
कु. चेतना हिने ‘वाचाल तर समृद्ध व्हाल’ या विषयावर प्रभावी वक्तृत्व सादर करत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे DYSP श्री. विजय ठाकूरवाड यांच्या उपस्थितीत कु. चेतना हिचा सन्मानपत्र, पुष्प व रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
या यशाबद्दल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पाचोरा यांच्या वतीने कु. चेतना रणदीप हिरे हिचे अभिनंदन करण्यात आले. तिच्या या यशाबद्दल संस्थेतील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांकडून तिचे कौतुक करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..

​पिंपळगाव हरेश्वर येथील 'दि लॉर्ड इंग्लिश मीडियम स्कूल'मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू!