पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.
पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.
शिवसेनेचे खंबीर नेतृत्व पक्षप्रमुख मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब व आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील मा. उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेचे कट्टर समर्थक कोमलसिंग देशमुख, दिलीप फुलचंद जैन,बी. डी. पाटील सर, पांडुरंग खंडू चोरमले, हमदेखा बाबेखा पठाण, शे. सलीम शेख बशीर, पद्माकर किसन बडगुजर, राजेंद्र मोतीलाल हिवाळे, रुपेश किशोर बडगुजर, सुरेश त्रंबक गुजर यांनी उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेला कायमचा जयमहाराष्ट्र करत शिवसेनेचे खंबीर नेतृत्व पक्षप्रमुख मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब व आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून स्वइच्छेने शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.
या कायर्क्रम प्रसंगी आमदार किशोर आप्पा पाटील, विनोद दादा तावडे, राजू पाटील, शालीग्राम मालकर, नंदू दादा पाटील, राकेश महाजन, निलेश पाटील, भगवान पाटील, किरण टेलर, रवी भाऊ गीते, देविदास पाटील, तोताराम पाटील, प्रदीप देशमुख सर, महेंद्र देशमुख,अल्लाउद्दीन तडवी, पवन तेली, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्तित होते. या कार्यक्रम प्रसंगी भगवान पाटील यांचे उपतालुकाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली व नियुक्तीपत्र देण्यात आले. यामुळे पाचोरा तालुक्यातील राजकारणात मोठा बदल होऊन राजकीय समीकरणे बदलण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या प्रवेश सोहळ्याप्रसंगी आमदार मा. किशोर आप्पा पाटील यांनी भगावा गळ्यात टाकून प्रत्येकाचे स्वागत केले. तसेच पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत तसेच पाचोरा शहरासह तालुक्यातील प्रत्येक गावागावात विकासाची कामे करुन सर्वसामान्य जनतेला सगळ्या सुखसोयी उपलब्ध करुन देणे हे माझे ध्येय आहे. आज तरुण वर्ग, जेष्ठ नागरिक व माता, भगिनींनी माझ्यावर विश्वास ठेवून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला हे विकासकार्यातील विश्वासाचे द्योतक आहे असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला उपजिल्हाप्रमुख किशोर बारवकर, जेष्ठ नेते शालिग्राम मालकर, तालुका प्रमुख नितीन तावडे,यांच्या सह तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. नव्याने प्रवेश केलेल्या नागरिकांनी गावोगाव शिवसेना बळकट करण्याचा संकल्प केला. या प्रवेशामुळे पाचोरा तालुक्यात शिवसेना (शिंदे गट) ला मोठी ताकद प्राप्त झाली असून आगामी स्थानिक जिल्हापरिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, निवडणुकीत त्याचा थेट परिणाम दिसणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
Comments
Post a Comment