चिकन, मटण शॉप, कत्तलखाने बंद; गॊमांस कत्तल व विक्री करत असतांना आढळ्यास होणार कार्यवाही, पिंपळगाव पोलीस स्टेशन तर्फे मोठा निर्णय.

चिकन, मटण शॉप, कत्तलखाने बंद; गॊमांस विक्री करत असतांना आढळ्यास होणार कार्यवाही, पिंपळगाव पोलीस स्टेशन तर्फे मोठा निर्णय.
मुख्य संपादक:-दिपक मुलमुले 

जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्वच  चिकन, मटण शॉप, कत्तलखाने बंद राहणार ठेवण्यासाठी व्यावसायिकांना नोटीस बजावून आगामी सण उत्सवांच्या  पार्श्वभूमीवर पिंपळगाव पोलीस स्टेशन येथे  महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
नोटीस मध्ये खालील प्रकारे नमूद करण्यात आले आहे.

विषय :- श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला (दहिहंडी) चे कालावधीत कत्तलखाने, बिफ व मटन / चिकन मास विक्री दुकाने बंद.
संदर्भ :- मा. जिल्हाधिकारी सो. जळगाव यांचे कडील पत्र क्र.दंडप्र./०१/ई-ऑफीस/२०२५/१० दि. ०४/०८/२०२५
आपणास याद्वारे कळविण्यात येते की, दि. १५/०८/२०२५ रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी व दि. १६/०८/२०२५ रोजी गोपाळ काला (दहिहंडी) या सणाचे कालावधीत कत्तलखाने, बिफ व मटन / चिकन मास विक्री दुकाने बंद ठेवणे बाबत मा. जिल्हाधिकारी सो. जळगाव यांचे कडील पत्र प्राप्त झाल्याने गावातील सर्व मटन, चिकन, बिफ मार्केट, मांस विक्री दुकाने बंद ठेवणे बाबत कळविण्यात येत आहे.

पिंपळगाव पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा  यांनी पिंपळगाव पोलीस स्टेशन ला कुरेशी व खाटीक समाज्यातील व्यावसायिकांची मिटिंग घेऊन  पिंपळगाव पोलीस स्टेशन  क्षेत्रातील चिकन, मटण शॉप, कत्तलखाने बंद करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच परीसरात गोवंश हत्या होत असल्यास पोलीस स्टेशन ला कळवावे असे आवाहन केले आहे.
त्यांनी खाटीक व कुरेशी समाजातील व्यावसायिकांना खालील प्रकारे सुचल्या केल्या आहेत.
1)पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत गोवंश जातीची कत्तल केली तर कुणाची गय केली जाणार नाही.त्याच्यावर कारदेशीर रित्या कार्यवाही केली जाईल. 
2) ज्यांच्या कडे चिकन, मटण,शॉप चालवायचे परवाने नसतील त्यांनी लवकरात लवकर आपले कायदेशीर परवाने  काढावे.
3) जिल्हा अधिकारी यांच्या आदेशानुसार आगामी गोपाळकाला, श्री कृष्ण जयंती, दहीहंडी निमित्त 15 ऑगस्ट व  16 ऑगस्ट या  तारखेला सर्व चिकन,मटण, मच्ची, व कत्तलखाणे बंद राहतील अश्या सूचना केल्या.
4)मांस विक्री बाबतच्या नियमांची पायमल्ली झाल्यास त्याच्यावर कायदेशीर रित्या कार्यवाही केली जाईल. 
5)पिंपळगाव परिसरात कोणत्याही प्रकारचे गोवंश जातीची कत्तल होत असल्यास त्वरित पोलीस स्टेशन ला कळवा त्याच्यावर कायदेशीर रित्या कार्यवाही केली जाईल असे मार्गदर्शनपर व सूचना सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांनी दिल्या.
6)उघड्यावर कुणीही मांस विक्री करू नये, आपल्या व्यवसायामुळे कुणाला त्रास होऊ नये अशी काळजी घ्यावी, 
आशा सर्व सूचना सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांनी केल्या आहेत. 
या प्रसंगी पिंपळगाव पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल अरुण राजपूत,हेडकॉन्स्टेबलराहुल बेहरे, पोलीस कोंस्टेबल अमोल पाटील,  पत्रकार किशोर लोहार, पत्रकार दिपक मुलमुले, पत्रकार चंद्रकांत माहोर, पिंपळगाव हरेश्वर, शिंदाड, सातगाव डोंगरी, वरखेडी, कुर्हाड परिसरातील खाटीक व कुरेशी समाजातील व्यावसायिक हे उपस्तित होते.

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.