भाऊसो श्री. शालिग्राम मालकर याची कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पदी बिनविरोध निवड.


भाऊसो श्री.शालिग्राम मालकर याची कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पदी बिनविरोध निवड.

कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापना 1945 स्थापनेपासून  पिंपळगाव हरेश्वरला एकही संचालक आत पर्यंत नसून बाजार समिती मध्ये पहिंल्यादाचा मालकर हे संचालक पदी विराजमान झाले आहे. खर तर बाजार समितीची उपसमिती पिंपळगाव हरेश्वर ला असायला पाहिजे कारण  तालुक्यातील मोठं गाव आहे. असे असताना देखील  उपसमिती  नाही.
भाजीपाला व धान्य उत्पादक मोठ्या प्रमाणावर असून उपसमिती ची नितांत आवशकता पिंपळगाव हरेश्वर या  गावाला आहे.शालिग्राम मालकर यांच्या रूपाने पिंपळगाव हरेश्वरला   ऐतिहासिक रित्या पहिल्यांदा संचालक पद मिळालं.त्यांच्यावर सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होतोय.पण आता शालिग्राम मालकर यांना पिंपळगाव हरेश्वरला उप बाजार समिती आणून संधीच सोनं करण्याची मोठी संधी चालून आलेली आहे.बाजार समिती च्या कजगाव, भडगाव, नगरदेवला, वरखेडी येथे उप समित्या आहेत.तसेच पिंपळगाव हरेश्वरला उप बाजार समिती आल्यास शेतकरी, व्यापारी यांचा वेळ व पैसा वाचेल तसेच अनेक बेरोजगारांना रोजगार मिळेल. शालिग्राम मालकर हे उप बाजार समिती साठी प्रयत्न करतील अश्या मोठ्या अपेक्षा  पिंपळगाव हरेश्वर वासियांच्या आहेत. 

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..