आषाढी यात्रेनिमित्त मुक्तानंद भजनी मंडळाची सुरेल भजनसेवा; भाविक मंत्रमुग्ध.


आषाढी यात्रेनिमित्त मुक्तानंद भजनी मंडळाची सुरेल भजनसेवा; भाविक मंत्रमुग्ध.

पिंपळगाव हरेश्वर | प्रतिनिधी दिपक मुलमुले 
श्रीक्षेत्र प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री समर्थ गोविंद महाराज मंदिर, पिंपळगाव हरेश्वर येथे सुरू असलेल्या आषाढी यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर मुक्तानंद भजनी मंडळ यांनी मंदिर परिसरात अत्यंत सुरेल व भक्तिरसपूर्ण भजनसेवा सादर केली. विठ्ठल-रुक्मिणी व श्री समर्थ गोविंद महाराज यांच्या नामस्मरणाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय झाला. मंडळाच्या सुमधुर भजनांनी उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले असून, त्यांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात भक्तिभावाने सहभाग नोंदवला.
भजनसेवेच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाची परंपरा जपण्याचे तसेच समाजात अध्यात्म, संस्कार आणि एकात्मतेचा संदेश देण्याचे कार्य मुक्तानंद भजनी मंडळाने प्रभावीपणे केले. मंदिर संस्थानच्या वतीने मंडळातील सर्व भजनसेवकांचे कौतुक करण्यात आले.
आषाढी यात्रेदरम्यान अशा धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, भाविकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..

​पिंपळगाव हरेश्वर येथील 'दि लॉर्ड इंग्लिश मीडियम स्कूल'मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू!