नाग पंचमी ला जिवंत सापाच पुजन न करता प्रतिमेचे पुजन करा सर्पमित्र दिनेश गायकवाड

नाग पंचमी ला जिवंत सापाच पुजन न करता प्रतिमेचे पुजन करा सर्पमित्र दिनेश गायकवाड
मुख्य संपादक:-दिपक मुलमुले 9595470800
 प्रमुख चार जातीच्या विषारी सापांपासुन सतर्कता बाळगा.

नाग, मण्यार,घोणस,फुरसे या चार विषारी सापांच्या जाती आहेत.

सापाविषयीची श्रध्दा असावी अंधश्रद्धा नको...

विषारी सापाचा दंश झाल्यास तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार घ्यावे.
पाचोरा तालुक्यासह पंचक्रोशीत दररोजच्या सर्पदंश झालेल्या घटना बघायला मिळतात... काही सर्पदंश झालेल्या लोकांना योग्य औषधोपचार न झाल्यास दगावतात तर काही जंतर मंतर करण्यातसाठी मांत्रिकाकडे जातात त्यांचा अमुल्य वेळ मांत्रिकाकडे गेल्यामुळे तो रुग्ण दगावतो तर सर्पदंश झाल्यास तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करावे..
आधुनिकतेच्या काळात तांत्रिक क्षेत्रात तर विस्तार झाला आहे पण आजही नागपंचमीसारख्या पर्वाचं महत्त्व कमी झालेलं नाही. नागपंचमी विषयी माहिती  वाचल्यास तुम्हाला कळेल की, फक्त नागपंचमी पर्व साजरं करण्याचं रूप बदललं आहे. नागदेवतेची पूजा करण्यासोबत आजकाल नागांच्या संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. आज वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर औषधांमध्ये नागापासून प्राप्त होणाऱ्या विषाचा वापर केला जातो. नागाच्या विषातील औषधी गुणांमुळे याच्या हलक्याशा मात्रेनेही अनेक लोकांचा जीव वाचवण्यात मदत होत आहे 
त्यामुळे नागरिकांनी सापाला न मारता तज्ञ सर्पमित्रांना बोलवून 
सुरक्षित रित्या पकडावा अशी माहिती सर्पमीत्र दिनेश गायकवाड गायकवाड यांनी दिली. 

श्रावण महिना सुरू झाला की, अनेक सण साजरे केले जातात. श्रावणातील अनेक सणांपैकी नागपंचमीसुद्धा असंच एक पर्व आहे. नागपंचमी मराठी माहिती आपल्यापैकी प्रत्येकाला असेलच. श्रावण महिन्यातील आराध्य दैवत भगवान शंकराला मानलं जातं. तसंच हा पावसाळ्याचा ऋतू असतो. असं मानलं जातं की, या काळात नाग बिळातून बाहेर पडून जमिनीवर येतात. या बाहेर पडलेल्या नागांमुळे कोणालाही अपाय होऊ नये म्हणून नागदेवतेला प्रसन्न करण्यासाठी नागपंचमीची पूजा करण्यात येऊ लागली. ज्याला नागपंचमी असं म्हटलं जातं. पण आज नागपंचमीला नाही पण नागाला आणि नागसंवर्धनाला खऱ्या अर्थाने महत्त्व प्राप्त झालं आहे.
आधुनिकतेच्या काळात तांत्रिक क्षेत्रात तर विस्तार झाला आहे पण आजही नागपंचमीसारख्या पर्वाचं महत्त्व कमी झालेलं नाही. नागपंचमी विषयी माहिती (Nag Panchami Mahiti) वाचल्यास तुम्हाला कळेल की, फक्त नागपंचमी पर्व साजरं करण्याचं रूप बदललं आहे. नागदेवतेची पूजा करण्यासोबत आजकाल नागांच्या संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. आज वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर औषधांमध्ये नागापासून प्राप्त होणाऱ्या विषाचा वापर केला जातो. नागाच्या विषातील औषधी गुणांमुळे याच्या हलक्याशा मात्रेनेही अनेक लोकांचा जीव वाचवण्यात मदत होत आहे 
असे ही सर्पमित्र दिनेश गायकवाड यांनी सांगितले


Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..

​पिंपळगाव हरेश्वर येथील 'दि लॉर्ड इंग्लिश मीडियम स्कूल'मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू!