पिंपळगाव हरे येथे हिवताप कार्यक्रम अंतर्गत ताप व कंटेनर सर्वेक्षण करण्यात आले.
दिपक मुलमुले 9595470800 पिंपळगाव हरे येथे हिवताप कार्यक्रम अंतर्गत ताप व कंटेनर सर्वेक्षण करण्यात आले. डॉ शेखर पाटील वरखेडी यांच्या मार्गदर्शनाखाली उपकेंद्र वरसाडे व पिंपळगाव हरे येथील संजयनगर या भागात आज हिवताप कार्यक्रम अंतर्गत सम्पूर्ण भागात ताप सर्वेक्षण व कंटेनर सर्वेक्षण करण्यात आले.यावेळी घरोघरी जाऊन कोरडा दिवस पाळण्यासंदर्भात आव्हान करण्यात आले,गटारी वाहत्या करण्यात आल्या,डबक्यात गप्पी मासे सोडण्यात आले,साठवलेल्या पाण्यात अँबेट टाकण्यात आले सर्दी ताप अशी लक्षणे असल्यास सरकारी दवाखान्यात उपचारासाठी यावे असे सांगितले या सर्व कामकाजास समुदाय वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका,आरोग्य सेवक,आशा सेविका यांनी वैद्यकीय अधिकारी मयूर पाटील प्रा.आ. केंद्र वरखेडी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यात आले. समुदाय आधिकारी डॉ. मयुरी ईगळे, आरोग्य सेवक गजानन ढाकरे, आशा सुपरवायझर प्रतीक्षा क्षिरसागर, आशा वर्कर माया लोहार, द्रोपता बाई,गोसावी छाया तडवी, सगिता हाटकर, व आगणवाडी ताई व मदतीनस यांनी सहभाग नोंदवला हिवतापाचा प्रादुर्भाव यशस्वीरित्या कमी करण्यास...