जळगाव निकृष्ट कामाची बातमी लावल्याचा राग मनात धरून नगरसेवकाची पत्रकाराला जीवे ठार मारण्याची धमकी

 जळगाव निकृष्ट कामाची बातमी लावल्याचा राग मनात धरून नगरसेवकाची पत्रकाराला जीवे ठार मारण्याची धमकी




अमळनेर  येथील पत्रकार तथा दिव्य लोकतंत्र न्यूज पोर्टलचे संपादक समाधान मैराळे यांनी प्रभाग क्रमांक 2 मधील निकृष्ट दर्जाच्या कामांसादर्भात बातमी प्रसिद्ध केल्याच्या रागाने प्रभाग क्रमांक 2 चे नगरसेवक संतोष पाटील उर्फ भुरा आप्पा यांनी पत्रकार समाधान मैराळे यांना फोन करुन खोटा गुन्हा दाखल करून अडकवून टाकू. आणि जर बातम्या थांबवल्या नाहीत तर जीवे ठार मारू अशी धमकी दिली. या बाबत अमळनेर पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. 

या बाबत सविस्तर वृत्त असे की, दिव्य लोकतंत्र ऑनलाइन न्युज पोर्टलचे संपादक समाधान मैराळे यांनी गेल्या काही दिवसांपासून शहरातील निकृष्ट कामांसंदर्भात बातम्या प्रकाशित केल्या होत्या. त्याच प्रकारे अमळनेर शहरातील प्रभाग क्रमांक 2 मधील सानेनगर भागातील देखील बातम्या प्रसिद्ध केल्या. याचा संबंधित नगरसेवकाला राग आल्याने त्याने पत्रकार मैराळेंना फोन करून अरेरावीची भाषा करत खोटा गुन्हा दाखल करून अडकवून देऊ अशी धमकी दिली. तर बातम्या थांबवल्या नाहीत तर जीवे ठार मारू अशीही धमकी दिली होती. याच बाबत आज अमळनेर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान संबंधित नगरसेवकावर पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

Comments

Popular posts from this blog

चिकन, मटण शॉप, कत्तलखाने बंद; गॊमांस कत्तल व विक्री करत असतांना आढळ्यास होणार कार्यवाही, पिंपळगाव पोलीस स्टेशन तर्फे मोठा निर्णय.

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.