पिंपळगाव हरेश्वर येथील ग्राम विकास विद्यालयात विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत....
दिपक मुलमुले ९५९५४७०८००
ग्राम विकास विद्यालय येथे विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत....
पिंपळगाव हरेश्वर येथील ग्राम विकास विद्यालय व खाजगी प्राथमिक विद्यालय दिनांक 15-6- 2022 वार बुधवार रोजी शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी ढोल ताशांच्या गजरात मुला व मुलींचे फुल व मिठाई देऊन संपूर्ण गावातून बैल गाडी व ट्रॅक्टर सजवून मिरवणूक काढण्यात आली. तसेच विध्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आले.
या प्रसंगी ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष देविदास महाजन, चिटणीस रवींद्र जाधव , संचालक डॉ शांतीलाल जी तेली, संचालक मिलिंद देव, संचालक विजय सावळे सर्व संचालक मंडळ तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री.पी एस महाजन सर खाजगी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यपक महालपुरे सर उपमुख्याध्यापक श्री.पी जे तेली सर, पर्यवेक्षक श्री पी ओ चौधरी सर,श्री.व्ही आर पाटील सर,श्री आर जे चिंचोले सर व सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कमर्चारी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमाला यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी प्राथमिक विदया मंदिर व ग्राम विकास विदयालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.





Comments
Post a Comment