वरखेडी येथील बँक लुटीचा प्रयत्न करणारा अट्टल घरफोडया स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांच्या जाळयात.
दिपक मुलमुले वार्ताहर ता.पाचोरा ९५९५४७०८००
मा. पोलीस अधीक्षक डॉ. श्री प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे यांनी मा. पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार बकाले स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना जळगाव जिल्ह्यात सध्या जळगाव जिल्हयात घरफोडीचे प्रमाणे वाढले आहे तरी त्याबाबत शोध घेवून योग्य ती कारवाई करा असे आदेश दिले होते. त्यावरुन मा. पोलीस •निरीक्षक श्रीकुमार बकाले यांनी स्थानिक गुन्हे शाखे कडील पो. उपनिरीक्षक अमोल देवढे, पोहेकाँ लक्ष्मण अरुण पाटील, पोना किशोर ममराज राठोड, पोना रणजीत अशोक जाधव, पोकों विनोद सुभाष पाटील सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव अश्यांचे पथक नेमण्यात आले होते.
मा. पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार बकाले स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना मिळालेल्या गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, पिंपळगाव हरे भाग ०५ गु.र.नं. १४८ / २०२२ भादवी क. ४५७, ३८०, ५११ या गुन्ह्यातील आरोपीताचा शोध घेणे कामी वर नमुद पोलीस पथक खाजगी वाहनाने वरखेडी ता.पाचोरा येथे वँख ऑफ महाराष्ट्र येथे जाउन CCTV फुटेज च्या आधारे सदर फुटेज मधील संशयीत ईसम हा जामनेर तालुक्यातील कासली येथील रहीवाशी असल्याची माहीती मिळाली. त्यावरून सदर पथकाने कासली ता. जामनेर गावात सदर संशयीत इसमाचा कसून शोध घेतला असता सदर संशयीत हा जुबेर ईकबाल तडवी असुन तो पहुर येथील आठवडा बाजारात गेले असल्याचे समजले. त्यावरुन सदर पथक हे तत्काळ पहुर गाठून तेथे संशयीत जुबेर इकबाल तडवी वय २२ रा. कासली ता. जामनेर यास ताब्यात घेउन त्यास विश्वासात घेउन विचारपुस केली असता त्याने पिंपळगाव हरे, भाग ०५ गु.र.नं. १४८/२०२२ भादवी क४५७, ३८०, ५११ या गुन्ह्याची कबुली दिली आहे. तसेच जामनेर पोस्टे भाग ०५ गु.र.नं. २४१ / २०२२ भादवी क. ४५७, ३८०, ५११ हा गुन्हा केल्याची देखील कबुली दिल्याने त्यास ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी करुन पुढील कारवाईसाठी पिंपळगाव हरे. पोस्टे च्या ताब्यात दिले आहे.

Comments
Post a Comment