राजुरी येथील वि.का.सो. बिनविरोध:चेअरमनपदी भाऊराव पाटील....



राजुरी येथील वि.का.सो. बिनविरोध:चेअरमनपदी भाऊराव  पाटील....
              चेअरमन भाऊराव मोतीराम पाटील यांचे स्वागत करतांना मान्यवर..
     व्हाईस चेअरमन घनश्याम चिंतामण पाटील  


  पिंपळगाव हरे  येथून जवळच असलेल्या राजुरी बुद्रुक व खुर्द विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची चेअरमन व्हा. चेअरमन निवड बिनविरोध झाली.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी बी.के. कोळी हे होते. चेअरमनपदी भाऊराव मोतीराम पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांना सूचक म्हणून अनंतराव एकनाथ पाटील तर अनुमोदक म्हणून नारायण चिंधा पाटील हे होते तसेच व्हाईस चेअरमन पदी घनश्याम चिंतामण पाटील यांचीदेखील बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांना सूचक म्हणून प्रेमचंद पाटील तर अनुमोदक म्हणून रामभाऊ महादू पाटील हे होते.
यावेळी गावातील सहकार क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांनी विजयाचा आनंद व्यक्त केला. याला राजुरी येथील शशिकांत पाटील यांचे मोलाचे योगदान लाभले.यावेळी सचिव कैलास मधुकर पाटील तसेच सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. नियुक्तीची प्रक्रिया आटोपल्यानंतर पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात. मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. 

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..