डॉ पंडीत विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा...

 दिनेश चौधरी, लोहारा (प्रतिनिधी ) 

डॉ पंडीत विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा...


शेंदुर्णी सेंक एज्यु को- ऑप सोसा द्वारा संचालित डॉ जे जी. पंडीत माध्यमिक विद्यालय लोहारा विद्यालयात आज  दिनांक 15- 6-  2022 वार बुधवार रोजी शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य. पुस्तकांचा सेट व गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले .प्रथम सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या गेटपासून वाजत गाजत विद्यालयात प्रवेश देण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी गावातील पंचायत समितीच्या उपसभापती सौ. अनिताताई चौधरी ,ग्रामपंचायत सदस्य कैलास आप्पा चौधरी, ईश्वरभाऊ देशमुख पत्रकार दिपक चौधरी तसेच गावातील विविध क्षेत्रातील मान्यवर यामध्ये तुषारभाऊ कासार ,उमेशभाऊ देशमुख, अरुण निकम, मुकेश पालीवाल, सौ .ज्योतीताई क्षीरसागर ,म्हसास येथील पालक भारत पाटील, इत्यादी मान्यवर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आर एस परदेशी, पर्यवेक्षिका सौ .यु. डी . शेळके मॅडम सर्व  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री व्ही एम शिरपूरे यांनी केले, तर आभार श्री पी एम सुर्वे यांनी मानले.




Comments

Popular posts from this blog

चिकन, मटण शॉप, कत्तलखाने बंद; गॊमांस कत्तल व विक्री करत असतांना आढळ्यास होणार कार्यवाही, पिंपळगाव पोलीस स्टेशन तर्फे मोठा निर्णय.

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.