पिंपळगाव हरे ग्रामीण रुग्णालयात डॉ.कुंदन वाघ यांची नियुक्ती.

 दिपक मुलमुले पिंपळगाव हरे  9595470800

पिंपळगाव हरे ग्रामीण रुग्णालयात डॉ.कुंदन वाघ यांची नियुक्ती,

दै.देशदूत बातमीची दखल : ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर मागणीला यश...


गेल्या 13 जून या तारखेला देशदूत वृत्त पत्रात पिंपळगाव हरे येथे डॉक्टर मिळावा अशी  बातमी प्रकशित केली गेली होती त्याची दखल घेत जळगाव येथील सिव्हिल सर्जन डॉ.किरण पाटील यांनी पिंपळगाव हरेश्वर येथे डॉक्टर यांची नियुक्ती केली आहे पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरे ग्रामीण रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून डॉक्टर नसल्यामुळे गरीब रुग्णांचे हाल होत होते याची माहिती पिंपळगाव येथील देशदूत चे पत्रकार  दिपक मुलमुले  यांना मिळाली असता त्यांनी ताबडतोब महाराष्ट्र राज्य माळी समाज प्रदेशाध्यक्ष शालिग्राम मालकर यांना जाऊन सांगितले असता त्यांनी दोघानीं जाऊन  जळगाव येथे  सिव्हिल सर्जन डॉ.किरण पाटील यांची भेट घेऊन  पिंपळगाव हरे  येथे ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी मिळावा अशी मागणी केली असता त्यांची मागणी  लवकरच  मान्य करून 20 जून सोमवार रोजी   सिल्लोड  येथील   तालुका कृषी अधिकारी सोयगाव संपत वाघ यांचे चिरंजीव   डॉ.कुंदन संपत वाघ  शिक्षण M.B.B.S.फिलिपिन्स या देशातून  (विदेशातून) आपले शिक्षण पूर्ण केले आहे. रा.हळदा ह.मु.सिल्लोड. यांची पिंपळगाव हरे ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून निवड करण्यात आली तसेच लवकरच अजून दोन डॉक्टर पिंपळगाव हरे येथील ग्रामीण रुग्णालयाला नियुक्त करण्यात येतील अशी माहिती सिव्हिल सर्जन डॉ.किरण पाटील यांनी दिली आहे.सिव्हिल सर्जन यांनी पिंपळगाव ग्रामीण रुग्णालयाची तात्काळ दखल घेऊन डॉक्टरांची नियुक्ती केली त्या मुळे गावातील ग्रामस्तानतर्फे त्यांचे आभार व्यक्त केले जात आहे.

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..