कुऱ्हाड येथे तब्बल बावीस वर्षे विद्यार्जन करून शिक्षिका झाल्या सेवानिवृत्त
कुऱ्हाड प्रतिनिधी सुनील लोहार 98605 57232
कुऱ्हाड येथे तब्बल बावीस वर्षे विद्यार्जन करून शिक्षिका झाल्या सेवानिवृत्त...
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित आदर्श माध्यमिक विद्यालय कुर्हाड खुर्द येथील उपशिक्षिका श्रीमती विमल धुडकु वानखेडे या 31.05.2022 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यात.त्यांचा आदर्श विद्यालयामध्ये सेवापूर्ती सत्कार समारंभ विद्यालयाचे स्थानिक चेअरमन सतीश चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली सन्मानपूर्वक पार पडला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आर.एम.पाटील माहिजी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एकनाथ सुरवाडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पी एच पाटील यांनी केले. ॲड.अशोक बाग, श्रीमती सुनीता देवरे,दिलीप वानखेडे,श्रीमती श्रद्धा ठाकूर,काकासाहेब ठाकूर, ज्येष्ठ शिक्षक सुहास मोरे , सुधाकर गायकवाड , दिपक राजपुत ,श्रद्धा पाटील मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले.
श्रीमती वानखेडे यांचा सत्कार करताना शालेय समिती व शिक्षक वर्ग
अध्यक्षीय भाषणात स्थानिक अध्यक्ष सतीश चौधरी यांनी श्रीमती वानखडे यांना भावी आयुष्य कुटुंबासाठी,समाजासाठी तसेच पर्यटनासाठी व्यथित करावे अशी सदिच्छा व्यक्त केली. तसेच भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी श्रीमती वानखेडे यांनी कुऱ्हाड येथे लागोपाठ बावीस वर्षे या विद्यालयात ज्ञानार्जन करून अनेक विद्यार्थी घडविले,.यावेळी आजी माजी विद्यार्थ्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला.आभार प्रदर्शन श्री संदीप पाटील यांनी केले.


Comments
Post a Comment