दिपक मुलमुले 9595470800
पिंपळगाव हरे. पोलिसांची कामगिरी ; दुचाकी लांबविरा चोरटा जेरबंद...
सविस्तर वृत्त असे कि पिंपळगाव येथील रमेश दत्तात्रय वाघ यांची मोटार सायकल MH 19 CP 2256 ही दिनांक 23/06/2022 रोजी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरासमोरून चोरून नेली होती सदर बाबत पिंपळगाव पोलिस स्टेशन ला गु.र.न. 162/2022 भा.द.वि. 379 नुसार दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास पो.ना.2572 रवींद्र पाटील हे करीत होते त्यांनी पो.हवा. 2658 रणजीत पाटील, पो. कॉ. 476 पंकज सोनावणे,पो.कॉ. 1403 मनोज बडगुजर, पो. कॉ .964 संभाजी सरोदे यांच्या मदतीने सदर गुन्ह्यातील आरोपी चेतन उर्फ सोनू भोई यास पिंपळगाव हरे येथून सदर गुन्ह्यात अटक करून त्याचे कडून सदर गुन्ह्यातील मोटार सायकल शिवना येथून हस्तगत केली आहे. सदर कारवाई मा. पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, डी.वाय.एस.पी. भारत काकडे, सपोनी महेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.सदर गुन्ह्याचा तपास पो.ना रवींद्र पाटील हे करीत आहे

Comments
Post a Comment