मुख्यमंत्र्यांचा मुलगा, व पिंपळगाव हरेश्वर येथील तरुण यासह महाराष्ट्रातील पाच संशोधकांचे संशोधन !! तमिळनाडूतून नव्या विंचवाच्या प्रजातीच्या शोध !
दिपक मुलमुले 9595470800
तमिळनाडूतून नव्या विंचवाच्या प्रजातीच्या शोध !पश्चिम घाटातल्या अगस्त्यामलाई शिखरावरुन नामकरण.पिंपळगाव हरे सह महाराष्ट्रातील पाच तरुण संशोधकांचे संशोधन !!
नुकताच तमिळनाडूमधून नव्या विंचवाच्या प्रजातीचा शोध लावण्यात ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनच्या संशोधकांना यश आलय. संशोधकात अक्षय खांडेकर; तेजस ठाकरे; स्वप्निल पवार; सत्पाल गंगलमाले; आणि विवेक वाघे यांचा समावेश आहे.
नव्याने सापडलेली प्रजाती ही हॉरमुरीडी कुळातल्या चिरोमॅचेटस या जातीमधील आहे. सदर चिरोमॅचेटस जात ही भारतीय द्विपल्कासाठी प्रदेशनिष्ठ असून त्यात आतापर्यंत पाच प्रजाती विज्ञानाला ज्ञात होत्या, आता नव्याने शोध लागलेल्या प्रजातीमुळे ही संख्या सहावर गेली आहे.
पाच मधील तीन प्रजाती या महाराष्ट्र, एक केरळ, आणि एक आंध्रप्रदेश मधून ज्ञात होत्या, तमिळनाडूत चिरोमॅचेटस या जातीची ही पहिलीच नोंद आहे.
ही प्रजाती तमिळनाडूमधील तिरुनेवेली जिल्ह्यातील अगस्त्यामलाई शिखराजवळ समुद्रसपाटीपासून 900 ते 1150 मीटर उंचीवर एप्रिल 2021 मध्ये आढळून आली होती.,
सदर प्रजातीच्या नमुन्यांवर साधारण वर्षभर संशोधन केल्यानंतर ही प्रजाती अगोदर ज्ञात असलेल्या कुठल्याही प्रजाती पेक्षा वेगळी असल्याचे लक्षात आले आणि नंतर त्यासंबंधीचा संशोधन निबंध सादर करण्यात आला. आतंरराष्ट्रीय विंचुतज्ञानी सदर संशोधनाबाबतची पडताळणी करून पुष्टि केल्यानंतर हा निबंध 22 जून रोजी अमेरिकेच्या मार्शल विद्यापीठाच्या युस्कॉर्पिअस या आतंरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेतून प्रकाशित करण्यात आला.
अगस्त्यामलाई शिखराजवळ हा विंचु आढळून आला म्हणून त्याचे नामकरण Chiromachetes agasthyamalaiensis (चिरोमॅचेटस अगस्त्यामलाएनसीस) असे करण्यात आले आहे.
रंग, नांगीच्या विविध भागांच्या लांबी आणि रुंदी यांची गुणोत्तरे, पेक्टीनल टीथची संख्या यासह इतर अनेक वैशिष्ट्यांसह ही प्रजाती आपल्या जातीतील इतर प्रजातीपेक्षा वेगळी ठरते. नवीन प्रजाती इतर विंचवांप्रमाणेच निशाचर असून ती अगस्त्यामलाई डोंगरात सदाहरित प्रकारच्या जंगलातील मोठाले दगड आणि खडकांच्या कपरींमध्ये आढळून येते.
पश्चिम घाट जैवविविधतेने संपन्न असून मागील अनेक दशकांपासून संशोधकांची मोठी फळी यावर काम करीत आहे, पण अजूनही विज्ञानाला ठावूक नसलेल्या प्रजातींचा शोध लागत असल्यामुळे पश्चिम घाट आणि एकूणच भारतीय पर्यावरणीय संशोधनाची गरज मोठी आहे, हेच अधोरेखित होते.
टीप- यातील तेजस ठाकरे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांचे चिरंजीव आहेत.

Comments
Post a Comment