पाचोरा येथील चित्रकला महाविद्यालयाचा निकाल जाहीर. ए. टी. डी.परिक्षेत मुलींनी मारली बाजी.

दिपक मुलमुले पिंपळगाव हरे 9595470800

पाचोरा येथील चित्रकला महाविद्यालयाचा निकाल जाहीर. ए. टी. डी.परिक्षेत मुलींनी मारली बाजी.
पाचोरा येथील स्वर्गीय अनिलदादा देशमुख चित्रकला महाविद्यालयाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात कलासंचलनालयातर्फे घेण्यात आलेल्या शासकीय उच्चकला परीक्षा ए. टी. डी. प्रथम वर्षाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून गतवर्षाप्रमाणेच यंदाही मुलींनी आघाडी घेत बाजी मारली आहे.
यात महाविद्यालयातून प्रथम क्रमांक अमृता गोविंद पाटील, द्वितीय क्रमांक मयुरी गोकुळ राठोड, तृतीय मयुरी परशुराम पवार उत्तीर्ण झाल्या आहेत. या यशस्वी विद्यार्थीनींचे संस्थेच्या अध्यक्षा सौ.कुसुम मित्रा मॅडम, सचिव श्री. नरेश मित्रा सर, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. श्री. संदीप पाटील सर, प्रा. निलेश शिंपी, जेष्ठ कला शिक्षक श्री. जितू काळे, राहुल पाटील, प्रमोद पाटील, शैलेश कुलकर्णी, सुबोध कांतायन,संदीप परदेशी, परशुराम पवार, देसले सर, राहुल सोनवणे तसेच पालकांनी कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog

अट्टल पिकअप गाडी चोर पिंपळगाव हरेश्वर पोलिसांच्या ताब्यात...पोलिसांची मोठी कामगिरी..

पोलीस बनून गेला बहिणीला कॉफी पुरवण्यासाठी भाऊ अन बिंग फुटले; पोलिसात गुन्हा दाखल.

लेखणीचा शिलेदार देतो शेतकरी अवजारांना धार-सुनील लोहार.