सातगाव येथील पोस्ट बेसिक माध्यमिक विद्यालय व आदर्श आश्रम शाळेत जागतिक योग दिनानिमित्त योग दिन साजरा.
दिपक मुलमुले 95954470800
सातगाव येथील पोस्ट बेसिक माध्यमिक विद्यालय व आदर्श आश्रम शाळेत जागतिक योग दिनानिमित्त योग दिन साजरा.
दरवर्षी दि. २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून २०१५ पासून साजरा केला जात आहे. या वर्षी दिनांक २१ जून २०२२ रोजी आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात येत असल्याने पोस्ट बेसिक माध्यमिक विद्यालय व आदर्श आश्रमशाळा सातगाव डोंगरी येथील आदिवासी आश्रम शाळेत जागतिक योगा दिवस साजरा करण्यात
यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला योगाशिक्षक म्हणून मनगटे सर यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनी योगासने केली. योगाचे महत्व दैनंदिन जीवनामध्ये योगा विषयी चांगल्या सवयी भौतिक ज्ञान गरजेचे आहे .दररोज योगा करून जीवन आनंददायी सुखकर बनवा असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले .योगाची विविध आसने विद्यार्थ्यांसमोर करून दाखवली व विद्यार्थ्यांकडून करून घेतली.योगा दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला.योगा दिनाचे महत्त्व मुख्याध्यापक उत्तमराव मनगटे पाटील, मुख्याध्यापक राहुल पाटील यांनी सांगितले. सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनींनी जागतिक योगाचे महत्व जाणून योगा केला. या शाळेमध्ये दररोज नियमित पणे सकाळी योगा कार्यक्रम होत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना सकाळी उठण्याची सवय लागते व दिवसभर मन प्रसन्न राहून विद्यार्थी विद्यार्जन चांगल्या पद्धतीने करतात.
योग शास्त्र ही भारतीयांची जगाला दिलेली देणगी आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह, स्थौल्य, थायरॉईड वृध्दी, मनोविकार इ. जीवनशैलीमुळे निर्माण झालेले अनेक आजार नियमित योग करण्याने नियंत्रित किंवा कमी होऊ शकतात. योगाच्या दैनंदिन आचरणामुळे निरोगी राहण्यास व रोगमुक्त होण्यामध्ये मदत होते.असे विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी यावेळी सांगितले.यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment