दुर्गा ईच्छा मित्र मंडळ,जामनेर यांच्या संकल्पनेतून पाचोरा येथील सुप्रसिद्ध शीतल आर्ट च्या कलाकारांनी रांगोळीतून साकारलेल्या कलाकृतीचे भव्य रांगोळी प्रदर्शन.
दिपक मुलमुले ९५९५४७०८०० शहरातील जामनेरपुरा येथील दुर्गा ईच्छा मित्र मंडळ सरदार पटेल नगर, कस्तुरी नगर येथे रांगोळीतून साकारलेल्या कलाक्रुतीचे भव्य व सुंदर प्रदर्शन आयोजित करण्यात आले. पाचोरा येथील सुप्रसिद्ध "शितल आर्ट्स" च्या कलाकारांनी सुंदर रांगोळीतून जगदंबेची अनेक रुपे व राज्याचे ग्रामविकास पंचायती राज व क्रीडा युवक कल्याण मंत्री ना. गिरीश महाजन यांची व जामनेर नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हुबेहुब प्रतिमा कलाकारांनी साकारली आहे. निशिकांत पाटील, शितल पाटील, स्नेहा नेरकर, साक्षी पाटील, अनुष्का पाटील, नयना गुजर, मयुरी पवार, प्रांजल पाटील, वैष्णवी पाटील, या कलाकारांनी सुबक व मनमोहक प्रकारच्या देवीची आकर्षक तब्बल नऊ प्रतिमेची जामनेर वासीयांसाठी पर्वणी ठरणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन जामनेर नगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून सुरुवात करण्यात आले. त्याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, स्थानिक वार्डाच्या नगरसेविका किरण पोळ, सामाजिक कार्यकर्ते सुभाष पवार, गणेश पोळ, ओम खुरपुडे, किरण मदाने, तसेच मंडळाच...