धक्कादायक चालत्या बस च्या पत्र्यामुळे कापले दोघांचे हात; एक जण गंभीर.

धक्कादायक चालत्या बस च्या पत्र्यामुळे कापले दोघांचे हात; एक जण गंभीर.


मलकापूर,
मलकापूर-पिंपळगांव येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. धावत्या एसटी बसच्या बाहेर आलेल्या पत्र्याने रस्त्यावरून चालणाऱ्या दोघांचा हात दंडापासून वेगळा झाल्याची भयंकर घटना आज सकाळी घडली.
या अपघातात दोघांचे हात कापले गेले आहेत तर तिसऱ्याच्या हातावर जबर खरचटले आहे. दोघांवर येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असून एकास अत्यवस्थ अवस्थेत जळगाव येथे हलविण्यात आले आहे.
मलकापूर आगारातून एसटी क्र. एम.एच.४०/एन.९१२१ ही आज शुक्रवारी सकाळी ६ वाजता निघाली होती. सकाळी ६.२० वाटेच्या सुमारास धावत्या एसटीचा चालकाच्या पाठीमागील बाहेर आलेल्या पत्र्याने विरूद्ध दिशेने आलेल्या मोटारसायकल स्वार गणेश शंकर पवार (वय ३६, रा. पिंपरी गवळी) यांच्या हाताला जबर खरचटले व एसटी पुढे धावली. धावत्या एसटीच्या बाहेर निघालेल्या पत्र्याच्या कचाट्यात पुढे पोलिस भरतीसाठी धावत असलेला विकास गजानन पांडे (वय २२, रा. उर्रा) बाहेर आलेल्या पत्र्याने त्याचा हात कलम केला तर त्याच्या डोक्यात गंभीर जखमा झाल्या. त्याची तब्येत खालावल्याने त्याला मलकापूर येथील खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले आहे. याच घटनेत धावत्या एसटीच्या बाहेर आलेल्या पत्र्याने परमेश्वर आनंदा सुरडकर (वय ४५ रा.आव्हा) यांचा देखील हात कलम झाला. त्याचबरोबर पोटावर गंभीर जखमा झाल्या. त्यांचे आतडे बाहेर आल्याने त्यांना अत्यवस्थ अवस्थेत जळगाव येथे हलविण्यात आले आहे.
या घटनेनंतर चालक देवराव भावराव सुर्यवंशी यांनी एसटी धामणगाव पोलिस स्टेशनमध्ये जमा केली आहे. मलकापूर एसटीच्या स्थानकावर मात्र या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिस उपनिरीक्षक द्वय सुखदेव भोरकडे व बालाजी सानप यांच्या नेतृत्वाखाली पोलीसांनी एसटी स्थानकात दाखल होऊन परिस्थिती हाताळल्याने एसटीच्या कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

Comments

Popular posts from this blog

चिकन, मटण शॉप, कत्तलखाने बंद; गॊमांस कत्तल व विक्री करत असतांना आढळ्यास होणार कार्यवाही, पिंपळगाव पोलीस स्टेशन तर्फे मोठा निर्णय.

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.