आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अभिष्टचिंतनपर कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २० सप्टेंबर रोजी मुक्ताईनगरात

 मुक्ताईनगरात 20 रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री येणार!




मुक्ताईनगर, पंकज तायडे 

          आमदार  चंद्रकांत पाटील  यांच्या अभिष्टचिंतनपर कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २० सप्टेंबर रोजी मुक्ताईनगरात येत आहेत.


मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा १४ सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. यंदा या वाढदिवसाला अतिशं जंगी पध्दतीत साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या दिवशी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे नियोजन करण्यात आले होते. तथापि, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आधीच या दिवसाला पूर्वनियोजीत कार्यक्रमांना हजेरी लावण्याचे निश्चीत केलेले आहे. यामुळे हा कार्यक्रम २० सप्टेंबर रोजी घेण्यात येणार असल्याचे आता निश्चीत करण्यात आले आहे.


या अनुषंगाने २० रोजी तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर भव्य कार्यक्रम आयोजीत करण्यात आलेला असून याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनाही आमंत्रीत करण्यात येणार आहे. या माध्यमातून आमदार चंद्रकांत पाटील हे मोठे शक्ती प्रदर्शन करणार असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, काल आमदार पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह या मैदानाची पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्या सोबत छोटू भोई, अफसर खान, राजेंद्र हिवराळे, पंकज राणे, गोपाळ सोनवणे, राजू टोंगे आदींची उपस्थिती होती

Comments

Popular posts from this blog

चिकन, मटण शॉप, कत्तलखाने बंद; गॊमांस कत्तल व विक्री करत असतांना आढळ्यास होणार कार्यवाही, पिंपळगाव पोलीस स्टेशन तर्फे मोठा निर्णय.

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.