मुक्ताईनगरात सायकलस्वार शाळकरी विद्यार्थीनीला बसने उडविले

मुक्ताईनगरात सायकलस्वार शाळकरी विद्यार्थीनीला बसने उडविले


मुक्ताईनगर,पंकज तायडे 
         : शहरात स्टेट बँकेजवळ सायकलने जात असलेल्या १२ वर्षाच्या एका विद्यार्थीनीला बसने उडविल्याने ती जखमी झाली असून रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

           याबाबत सविस्तर असे, एमएच १४ बीटी ०४१० या क्रमांकाची नवापूर डेपोची बस शेगाव ते नवापूर बस ही वेगात असतांना आज सकाळी शहरातील स्टेट बँकेजवळ सायकल असलेल्या १२ वर्षाच्या ऋतुजा राजेंद्र कोल्हे या विद्यार्थीनीला बसने धडक दिली. दिलेल्या धडकेत विद्यार्थीनी जखमी झाली तिच्या वर गोरे हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत तर सायकलचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.

घटनास्थळी परिवहन विभागाचे अधिकारी, पोलीस कर्मचारी दाखल झाले असून अद्याप पोलिसात कुठली गुन्ह्याची नोंद नाही. जीवन मेश्राम असे या ड्रायव्हरचे नाव असून तो स्वतःहून पोलीस स्टेशन येथे दाखल झालेला आहे नगरपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे घटना घडल्याचा नागरिकांचा आरोप असून मुक्ताईनगरच्या हायवे चौफुलि पासून ते प्रवर्तन चौकापर्यंत बेशिस्त वाहतुकीने अक्षरश: कळस मांडला असून नागरिक आपले चार चाकी, मोटरसायकल रस्त्यावर पार्क करत असल्यामुळे सायकलस्वार व मोटरसायकल स्वारांना बस व मोठी गाडी आल्यास जीव मुठीत घेऊन आपले वाहन चालवावे लागते नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी या बेसिस्त

वाहतुकीला शिस्त लावण्याची गरज आहे.

Comments

Popular posts from this blog

चिकन, मटण शॉप, कत्तलखाने बंद; गॊमांस कत्तल व विक्री करत असतांना आढळ्यास होणार कार्यवाही, पिंपळगाव पोलीस स्टेशन तर्फे मोठा निर्णय.

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.