गणेश विसर्जन करून परतताना अपघात, दोन गंभीर
गणेश विसर्जन करून परतताना अपघात, दोन गंभीर
मुक्ताईनगर, पंकज तायडे
महाराष्ट्रासह जिल्ह्यात शुक्रवारी रोजी विविध ठिकाणी गणेश विसर्जन करण्यात आले. श्रींची मिरवणुकीनंतर नदी, कालवे आणि धरणातून सार्वजनिक गणपतींचे विसर्जन करताना जिल्ह्यात विविध ठिकाणी तब्ब्ल तीन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. त्यानंतर गणेश विसर्जन करून घराकडे परतणाऱ्या ट्रॅक्टरला मागुन आयशरने दिलेल्या धडकेत दोन जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती समोर आहे. याबाबत पोलिसांत अद्याप नोंद करण्यात आलेली नाहीय.
प्राथमिक माहितीच्या आधारे मिळालेल्या वृत्तानुसार, मुक्ताईनगर तालुक्यातील पुर्णा नदीवरील घोडसगाव पुलावर रात्री गणेश विसर्जन करून घराकडे परतण्याच्या तयारीत असणाऱ्या ट्रॅक्टरला (क्र.एम एच १९ ए पी ९१४६) मागून येणाऱ्या विना क्रमांकाची न्यु आयशर वाहनाने जोरदार धडक दिली. यात दोन जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती समोर आहे. अपघातातील जखमींचे नावे अद्याप कळू शकली नाही तसेच याबाबत अद्याप नोंद करण्यात आलेली नाहीय.
Comments
Post a Comment