मा.श्री. लक्ष्मण (आबासाहेब) सूर्यवंशीआयडियल जर्नलिस्ट असो.च्या केंद्रीय संयुक्त सचिव पदी.

मुख्य संपादक :- दिपक मुलमुले ९५९५४७०८००

मा.श्री. लक्ष्मण (आबासाहेब) सूर्यवंशीआयडियल जर्नलिस्ट असो.च्या केंद्रीय संयुक्त सचिव पदी.

 


आयडियल जर्नलिस्ट असो.च्या केंद्रीय संयुक्त सचिव पदी लक्ष्मण सूर्यवंशी* महाराष्ट्र महासचिव पदी सूर्यकांत कदम, महा. प्रदेश संपर्क प्रमुख लूनेश्वर भालेराव तर केरळ प्रदेश अध्यक्ष पदी प्रकाश नायर. 


पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी (भारत सरकार मान्यताप्राप्त पत्रकार संघटना) आयडियल जर्नलिस्ट असोसिएशनचा राज्य कार्यकारणीचा विस्तार करण्यात आला आहे. केंद्रीय संयुक्त सचिवपदी दैनिक देशदूतचे तालुका प्रतिनिधी लक्ष्मण सूर्यवंशी, महाराष्ट्र प्रदेश महासचिवपदी सूर्यकांत कदम (दैनिक भास्कर चाळीसगाव तालुका प्रतिनिधी), महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख पदावर मूळ धरणगाव चे (ह. मु. पिंप्री- चिंचवड) लूनेश्वर भालेराव (पुणे) तर केरळ प्रदेश अध्यक्ष पदी प्रकाश नायर यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.  
सदर नियुक्ती आयडियल जर्नलिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रमोद वाचस्पती (उत्तराखंड), केंद्रीय संयुक्त भारत प्रभारी अजयकुमार मिश्र (मुंबई), केंद्रीय सचिव संजय पांडे (दिल्ली) यांनी केली आहे. नियुक्ती चे पत्र प्राप्त झाले असून त्यांचे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता मुंबई मंत्रालयात विधि मंडळात पत्रकार म्हणून कर्तव्य बजावणारे प्रफुल्ल साळुंखे, (मुंबई), कला सांस्कृतिक विभाग प्रदेश अध्यक्ष यश काळे (चाळीसगाव), पश्चिम महाराष्ट्र संघटक मंदार तळणीकर, पिंप्री - चिंचवड विभाग प्रमुख नितीन सिनकर, पत्रकार मिलिंद सोनवणे, रविशंकर पांडे (वरखेडी), धनराज पाटील, प्रशांत येवले, कृष्णा शेळके (लोहारा), दिपक मुलमुले (पिंपळगाव- हरे.) यांचे सह राज्यातील संघटनेचे सर्व जिल्हाध्यक्ष, उप जिल्हाध्यक्ष, संघटक, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष यांनी तर  जळगांव जिल्ह्यात व तालुक्यातुन नवनियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन व कौतुक होते आहे.

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..