अंतुर्ली येथील श्री सिद्धिविनायक गणेश मंडळाने अध्यात्मिक कार्यक्रमामधून केले गणपती विसर्जन;भजनी मंडळी च्या साह्याने काढली गणपती विसर्जन मिरवणूक

अंतुर्ली येथील श्री सिद्धिविनायक गणेश मंडळाने अध्यात्मिक कार्यक्रमामधून केले गणपती विसर्जन;भजनी मंडळी च्या साह्याने काढली गणपती विसर्जन मिरवणूक


मुक्ताईनगर, पंकज तायडे 
         31 ऑगस्ट ला लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन झाले आपण मनोभावे दहा दिवस गणपती बाप्पाचे पूजन केले .दहा दिवसानंतर आपण शुक्रवारी ढोल ताशाच्या गजरात व डीजेच्या तालावर गुलालाची उधळण, फटाक्याची आतिषबाजी करत गणरायाला निरोप दिला. मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील काही मंडळांनी शुक्रवारी नऊ तारखेला तर काही मंडळांनी शनिवारी दहा तारखेला गणपती विसर्जन केले. आपण पाहत असतो की, गणपती विसर्जनाच्या दिवशी डीजे बँड लावून गणपती विसर्जन मिरवणूक काढली जाते. मात्र अंतुर्ली येथे श्री सिद्धिविनायक गणेश मंडळाने अध्यात्मिक कार्यक्रमांमधून भजनी मंडळाच्या द्वारे गणपती विसर्जन मिरवणूक काढली. भजनी मंडळाच्या साह्याने काढलेल्या गणपती विसर्जन मिरवणुकीत भाविक भक्तांनी पावल्या टाकल्या .खूप छान गायन केले व एक देखावा तयार केला या देखाव्यात संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर ,संत सोपान, संत आदिशक्ती मुक्ताबाई, संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकाराम यांचे पात्र साकारले .या मिरवणुकीत भजनी मंडळ, हभप सुनील महाराज करकी ,हभप प्रभाकर महाराज दुधलगाव, मृदुंगाचार्य ह भ प अंबादास महाराज मुक्ताईनगर या सर्वांनी छान गायन करून पावली खेळल्या. श्री सिद्धिविनायक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व महिलांनी भव्य पावल्या खेळण्याचा आनंद घेतला .या मिरवणुकीला शांताराम महाराज लोहारखेडा यांनी खूप उत्तम साथ दिली .प्रत्येक मंडळाने अध्यात्मिक प्रकारे भजनी मंडळाच्या साह्याने गणपती विसर्जन मिरवणूक काढायला हवी .अशा प्रकारे श्री सिद्धिविनायक गणेश मंडळाने  भजनी मंडळाच्या साह्याने गणरायाला निरोप दिला.

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..