पाचोरा येथे विर जवान माजी सैनिक संस्थे मार्फत माजी सैनिक मेळावा संपन्न.

 पाचोरा येथे विर जवान माजी सैनिक संस्थे मार्फत माजी सैनिक मेळावा संपन्न. 




पाचोरा येथील राजीव गांधी टाउन हॉलमध्ये वीर जवान माजी सैनिक संस्थामार्फत आयोजित माझी सैनिक मेळावा दिनांक 14 सप्टेंबर बुधवार रोजी सायंकाळी पाच वाजता पार पडला. या मेळाव्यात पाचोरा तालुक्यातील दीडशे माजी सैनिक तसेच 30 ते 32 माजी सैनिक पत्नी, वीर पत्नी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आलेल्या मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.



कार्यक्रमाचा मुख्य भाग म्हणजेच जळगाव सैनिक कल्याण कार्यालयाचे कल्याण अधिकारी सुभेदार मेजर अनुरथ् वाकडे साहेब यांनी माजी सैनिक व त्यांच्या परिवाराला मिळणाऱ्या आर्थिक सवलती, उपाययोजना व येणाऱ्या अडचणी यावर सविस्तर मार्गदर्शन केले आणि आपण पाचोरे करांसाठी सदैव हजर राहू असा विश्वास ही त्यनि दिला. तसेच वाकडे साहेबांनी वीर जवान माजी सैनिक संस्था यांना संपर्क कार्यालय उपलब्ध होऊन एक महिनाहि होत नाही तोवर त्यांनी मोठ्या प्रमाणात सैनिक मेळाव्याचे आयोजन करून माजी सैनिकांच्या प्रश्नांना मंच उपस्थित करून दिला म्हणून संस्थेची तोंड भरून प्रशंसा केली. या मेळाव्यात पाचोरा नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी श्री दगडू मराठे साहेब यांनी माजी सैनिकांना नुकतीच जाहीर झालेली मालमत्ता कर सवलती बाबत मार्गदर्शन केले तसेच योजनेबद्दल सविस्तर माहिती देत आलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन सर्व माजी सैनिकांच्या शंकांचे समाधान केले . तसेच या मेळाव्यात एसबीआय पाचोरा यांचे प्रतिनिधी श्री भीमराव पाटील यांनी माजी सैनिकांना एसबीआय मध्ये येणाऱ्या पेन्शन संबंधी अडचणी व आपली होणारि आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी मार्गदर्शन तसेच, देवगिरी बँकेचे गवळी साहेबांनी माजी सैनिकांना उद्योगासाठी लागणारे अर्थसहाय्य बद्दल मार्गदर्शन तसेच. आपल्या पाचोरा तालुक्यातील सीए अमोल जैन यांनी माजी सैनिकांना आयटीआर् संबधी   येणाऱ्या अडचणी व त्यावर उपाययोजना याबद्दल मार्गदर्शन केले व सर्व सैनिक बांधव व माजी सैनिक बांधवांसाठी मोफत आयटीआर् फाईल करण्याचे सुविधा उपलब्ध करून दिलेले आहे.



 सदरील कार्यक्रमास सुभेदार मेजर अनुरथ् वाकडे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी जळगाव, श्री दगडू मराठे उपमुख्य अधिकारी पाचोरा नगरपरिषद, बाळू पाटील् वीर जवान माजी सैनिक संस्था कार्याध्यक्ष पाचोरा, प्रमोद पाटील माजी सैनिक अध्यक्ष भडगाव तालुका, तसेच वीर जवान माजी सैनिक संस्था पाचोरा अध्यक्ष श्री दीपक पाटील उपाध्यक्ष श्री मधुकर पाटील सदस्य श्री रवींद्र पाटील संदीप पाटील, गजानन तेली, दत्तू खरे, अन्सार पटवे उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

चिकन, मटण शॉप, कत्तलखाने बंद; गॊमांस कत्तल व विक्री करत असतांना आढळ्यास होणार कार्यवाही, पिंपळगाव पोलीस स्टेशन तर्फे मोठा निर्णय.

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.