पिंपळगाव पोलिसांनी केला बकरी चोरीची पर्दा फाश......

   पिंपळगाव पोलिसांनी केला बकरी चोरीची पर्दा फाश......
पिंपळगाव पोलिस स्टेशन येथील डोंगरगावातील रवींद्र पंडित पाटील  यांच्या 15 बकऱ्या अज्ञात चोरट्याने दिनांक 5/8/2022 रोजी चोरून नेल्या होत्या त्याबाबत पिंपळगाव पोलिस स्टेशन येथे  गु. र.न.207/2022 भा. द. वि. 461 380 अन्वये गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यातील आरोपी यांचा तपास करून त्यातील आरोपी अनिस हकीम खाटीक यास अटक करण्यात आली असून त्यांचेकडून बकऱ्या विक्री केलेल्या पैशापैकी 35000/- रुपये हस्तगत करण्यात आले आहे. तसेच इतर आरोपी यांचा तसेच सदर प्रकारच्या इतर चोऱ्यांचा तपास सुरू आहे. सदरची कारवाई मा.पोलिस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे सर, मा.अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे सर, मा. उपविभागीय पोलिस अधिकारी भारत काकडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस  निरीक्षक महेंद्र वाघमारे, पोलिस उपनिरीक्षक अमोल पवार, पोलिस नाईक 692 गोकुळ सोनावणे, पोलिस नाईक 2572  रवींद्र पाटील, पोलिस हवालदार 2952 किरण ब्राम्हणे, पोलिस कॉन्स्टेबल जितेंद्र पाटील, पोलिस कॉन्स्टेबल पंकज सोनावणे, पोलिस कॉन्स्टेबल मुकेश लोकरे यांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..