मुक्ताईनगरच्या सेन्ट्रल बँक शाखा व्यवस्थापकाची तडका फडकी बदली
मुक्ताईनगरच्या सेन्ट्रल बँक शाखा व्यवस्थापकाची तडका फडकी बदली
मुक्ताईनगर ,पंकज तायडे
मुक्ताईनगर येथील सेन्ट्रल बँक शाखा व्यवस्थापकाची खासदार रक्षा खडसे यांच्या कार्यवाहीने तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. नवीन शाखा व्यवस्थापक गोपाळ पाटील यांना रुजू करण्यात येऊन त्यांना शाखेचा पदभार देण्यात आला आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकरी, व्यापारी इतर ग्राहकांच्या अनेक तक्रारी बाबत खासदार रक्षा खडसे यांनी सदर समस्या मांडण्याकामी तालुक्यातील सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मुक्ताईनगर, अंतुर्ली व कुऱ्हा यांच्या शाखा व्यवस्थापकांची बैठक आयोजित केली असता, मुक्ताईनगर येथील शाखा व्यवस्थापक सुमित कुमार झा हे बैठकीस २ तास उशिरा आले त्यांना खासदार कार्यालय मार्फत २ वेळा निरोप देण्यात आला होता. तसेच त्यांच्या बाबत ग्राहकांच्या अनेक तक्रारी होत्या, ते बँके मध्ये हजर राहत नाही, फोन केल्यास साईटवर आहे सांगतात तसेच बैठकीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत घरी झोपले होते.
याबाबत खासदार रक्षा खडसे यांनी त्यांना शेतकरी, व्यापारी इतर ग्राहकांच्या तक्रारी बाबत विचारणा केळी असता त्यांनी खासदारां सोबत अपशब्द वापरून बैठकीत गैरवर्तन केले. याबाबत खासदार रक्षा खडसे त्यांची तत्काळ बदली होणे बाबत सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया विभागीय व्यवस्थापक यांना याबाबत दूरध्वनीद्वारे चर्चा करून सांगितले तसेच लेखी तक्रार केली असता, आज दुसऱ्याच दिवशी सुमित कुमार झा यांची तडकाफडकी बदली करण्यात आली.
Comments
Post a Comment