भारत फायनान्स कंपनीला मुक्ताईनगर शाखेतील तिघा कर्मचाऱ्यांनी ६७ लाखात गंडविले!

भारत फायनान्स कंपनीला मुक्ताईनगर शाखेतील तिघा कर्मचाऱ्यांनी ६७ लाखात गंडविले!




मुक्ताईनगर, पंकज तायडे   
                शहरासह ग्रामीण भागातील गरजूंना हप्त्यांवर कर्ज पुरवठा करणारी भारत फायनान्स इक्लयुजन लिमिटेड कंपनीची मुक्ताईनगर शाखेतील तिघा कर्मचाऱ्यांनी तब्बल ६७ लाखात फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या घटनेने मुक्ताईनगरसह मलकापूर व रावेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मुक्ताईनगर शाखा व्यस्थापक एकनाथ भीमगीर गोसावी वय ३२, चाळीसगाव यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली. भारत फायनान्स कंपनीच्या मुक्ताईनगर शहरातील शाखेत काम करणारे फिल्ड असिस्टंटसह अन्य दोघा कर्मचारी यांनी २४७ महिलांचे अंगठे बायोमेट्रिक पद्धतीने घेतल्याचे भासवत कर्ज वाटप केल्याचे दर्शवत तब्बल ६६ लाख ६६ हजार ९२४ रुपयांची कंपनीची फसवणुक करीत पोबारा केला आहे.

Comments

Popular posts from this blog

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.

एका मनोरुग्ण महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोघांविरुद्द पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल..