विकास सोसायट्या वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळेवर कर्जफेड करा ---गुलाबराव देवकर यांचे पिंपळगाव हरेश्वर येथे प्रतिपादन
विकास सोसायट्या वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळेवर कर्जफेड करा ---गुलाबराव देवकर यांचे पिंपळगाव हरेश्वर येथे प्रतिपादन
आज दि 26 सप्टेंबर रोजी पिंपळगाव गुरुगोविंद सोसायटी ची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन शालिग्राम मालकर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांनी विकास सोसायट्या वाचवायच्या असतील तर कर्जदार शेतकऱ्यांनी वेळेवर कर्ज भरावे तसेच आता बिनव्याजी कर्जवाटप सुरु असल्याने त्याचा लाभ घ्यावा, तसेच गुरुगोविंद सोसायटी चा ऑडिट वर्ग सतत अ असून संस्थेची वसुली सुद्धा चांगली असल्याने संचालक मंडळाचे त्यांनी कौतुक केले, अनेक सोसायट्या अनिष्ठ तफावतीचा सामना करत असून यापुढे कर्ज माफी मिळणार नाही तरी शेतकऱ्यांनी नियमित परतफेड करावी असे आवाहन गुलाबराव देवकर यांनी केल,
यावेळी संस्थेचे चेअरमन यांनी आपल्या प्रस्ताविकात संस्थेचा लेखाजोखा सादर केला यात प्रामुख्याने खतविभाग आणि धान्यविभाग नफ्यात असून कर्ज वसुली 78% आहे तर 2021 ची वसुली 98% असून मागील थकबाकी आगामी काळात वसूल करणार असल्याचे सांगितले यावेळी सूत्रसंचालन प्रशांत तेली यांनी तर विषय वाचन सचिव दीपक पाटील यांनी तर आभार सुरेश भडांगे यांनी मानले.
बैठकीला संस्थेचे संचालक राजधर मालकर, राजेंद्र गिते, जयप्रकाश जैन, जोती चव्हाण, बालू बडगुजर, सुनील क्षीरसागर, विजय सावळे, तोताराम पाटील, राहुल बडगुजर, माजी चेअरमन विठ्ठल गिते, सुरेश बडगुजर, राजू क्षीरसागर, दिलीप जैन, कडुबा पाटील, अर्जुन जाधव सर, प्रभारी सरपंच सुकदेव गिते सर, हरेश्वर सोसायटी चेअरमन श्रीराम पाटील, पीक सोसायटी चेअरमन पंडित तेली, ग्राम विकास मंडळाचे सचिव रवींद्र जाधव, संचालक मौजूलाल जैन, दिवाकर बडगुजर, प्रदीप पवार, ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र देव, गोरख पाटील, बी डी पाटील सर, जेडीसीसी बँक मॅनेजर अमर पाटील, माजी सरपंच अशोक पाटील यांचेसह सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते, यशस्वीतेसाठी खतविभाग प्रमुख संजय मालकर, धान्य विभाग प्रमुख दिनेश बडगुजर, शिपाई अशोक मालकर यांनी परिश्रम घेतले
Comments
Post a Comment