Posts

Showing posts from April, 2023

माणुसकी फाउंडेशनच्या महिला जिल्हाध्यक्षपदी सायली महाजन...

Image
माणुसकी फाउंडेशनच्या महिला जिल्हाध्यक्षपदी सायली महाजन... माणुसकी मल्टीपर्पज फाउंडेशन महाराष्ट्र राज्यच्या जळगाव जिल्हा महिला जिल्हाध्यक्षपदी कु. सायली महाजन यांची निवड झाली आहे. मूळच्या खडका तालुका भुसावळ येथील रहिवासी असलेल्या कु. सायली गणेश महाजन या नेहमीच सामाजिक क्षेत्रात कार्यरत असता. त्या क्षत्रिय मराठा फाउंडेशन सोशल मीडियाच्या जळगाव जिल्हा प्रमुख, अखिल भारतीय लेवा विकास महासंघ, विद्याथी संघटना, जळगावच्या युवती प्रमुख व नॅशनल युथ कौन्सिल ऑफ इंडियाच्या भुसावळ तालुका सचिव आहेत. त्यांच्या या साजिक कार्याची दाखल घेत संस्थेचे अध्यक्ष विवेक राजापुरे यांनी त्यांची हि नियुक्ती केली आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य, महिला सक्षमीकरण, शैक्षणिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक, विकासात्मक व देश सेवेच्या कार्यात नेहमी अग्रेसर राहणार असल्याचे कु. सायली यांनी यावेळी सांगितले. त्यांची हि सर्व सामाजिक कार्ये आई रेखाताई महाजन, काका व खडका येथील माजी सरपंच भैया महाजन, कमलाकर महाजन, शंकर महाजन तसेच सर्व मित्र परिवार यांच्या सहकार्याने व जबाबदारीने योग्यरीत्या पार पडणार असेही त्यांनी सा...

सत्यशोधक समाज संघातर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन.

Image
सत्यशोधक समाज संघातर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन.         सत्यशोधक समाज संघ जळगाव तर्फे  विश्वभुषण भारतरत्न बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्ताने रेल्वे स्टेशन जळगाव समोरील बाबासाहेबांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अभिवादनाप्रसंगी भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी,ऑल इंडिया सेन समाज,देवकाई प्रतिष्ठान संघटना सोबत होत्या.याप्रसंगी बाबासाहेबांचा जयघोष करण्यात आला.कार्यक्रमाचे संयोजक तथा सत्यशोधक समाजाचे जिल्हा समन्वयक विजय लुल्हे ,सत्यशोधक समाजाचे प्रचारक रवींद्र तितरे व सुरेश सपकाळे,भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशीचे समन्वयक ह.भ.प.मनोहर खोंडे ,सभासद राजकुमार गवळी , देवकाई प्रतिष्ठान अध्यक्ष चित्रकार सुनील दाभाडे सर , पुस्तक भिशीचे सुदाम बडगुजर ,युवराज वाघ कार्यकर्ते उपस्थित होते.      बाबासाहेबांच्या जयंती निमित्ताने मानवंदना देणाऱ्या भीमसागराला भर उन्हात थंड पाण्याची निःशुल्क सेवा आम आदमी पार्टी युवा आघाडी जळगाव तर्फे देण्यात आली.थंड जल क्षुधाशांत...

विद्याभारती देवगिरी प्रांत शिक्षा संस्थान यांच्या वतीने प्रशिक्षण वर्गाचे आयोजन ...

Image
विद्याभारती देवगिरी प्रांत शिक्षा संस्थान यांच्या वतीने प्रशिक्षण वर्गाचे आयोजन .. शेंदूर्णी ता जामनेर:-प्रतिनिधी विद्याभारती अखिल भारतीय शिक्षण संस्था दिल्लीची संलग्नित विद्याभारती देवगिरी प्रांत शिक्षा संस्थान यांच्यावतीने अंगणवाडी (शिशु वर्ग ), पूर्व प्राथमिक, प्राथमिक शिक्षण आणि शिक्षक व पालकांसाठी पायाभूत स्तर एन.ई.पी. ( N..E.P. ) प्रशिक्षण वर्गाचे आयोजन ‌३ मे ते १३ मे २०२३ या कालावधीत अमळनेर जि. जळगाव येथे करण्यात आले आहे. आपल्यावर आलेली पालकत्वाची जबाबदारी हे निश्चितच कस लावणारी असते. प्रत्येक पालक आपल्या पाल्याला उत्तम दर्जेदार व संस्कारित शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करत असतो. यासाठी विद्याभारती शिक्षक, पालक, हितचिंतक यांच्यासाठी दरवर्षी एका प्रशिक्षण व प्रबोधन वर्गाचे आयोजन करत असते नुकतेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे एन. इ. पी. २०२० सर्वत्र लागू करण्यात आले आहे. या धोरणात शालेय शिक्षणाचे टप्पे ५+३+३+ ४ असे आहेत. या प्रशिक्षणात एन. ई. पी. ची ही माहिती देण्यात येणार आहे. याच वर्गात सोबत एन.ई. पी. वर्ग, बालिका शिक्षण, संस्कृति ज्ञान परीक्षा, वैदिक गणित, योग व संगि...

महात्मा जोतिराव फुले यांना सत्यशोधक समाज संघासह विविध संघटनातर्फे अभिवादन.

Image
महात्मा जोतिराव फुले यांना सत्यशोधक समाज संघासह विविध संघटनातर्फे अभिवादन.       राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांच्या १९६ व्या जयंतीनिमित्ताने सत्यशोधक समाज संघ जळगाव यांच्या नेतृत्वाने विविध संघटनातर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले.       जळगाव येथे दिनांक ११ एप्रिल २०२३ रोजी फुले मार्केट मधील क्रांतीसूर्य तथा सत्यशोधक महात्मा जोतिराव फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याला विश्वकर्मामय पांचाळ सहाय्यक मंडळ, जळगाव सचिव एम.टी.लुले यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ' जय ज्योती जय क्रांती ' चा जयघोष यावेळी सर्वांनी करून महात्मा फुलेंच्या कार्याचा गौरव केला.    प्रारंभी सत्यशोधक समाजाचे जळगाव जिल्हा समन्वयक विजय लुल्हे यांनी प्रस्तावनेत सत्यशोधक समाज संघातर्फे महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी शासकीय सुट्टी जाहीर करण्यासंदर्भात महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनाच्या वन टाईम राज्यव्यापी कार्यक्रमाची माहिती दिली. नंतर प्रचारक रवींद्र तितरे यांनी महात्मा फुले रचित सत्यशोधक समाजाची प्रार्थना उपस्थित फुले प्रेमींकडून स...

पाचोरा येथे एकदीवसीय मेकअप सेमिनार चे आयोजन.

Image
पाचोरा येथे एकदीवसीय मेकअप सेमिनार चे आयोजन. स्वतः साठी आणि ब्युटी पार्लर  व्यवसायात एक्सपर्ट होण्यासाठी  सुवर्ण संधी.पाचोरा शहरात एकदिवशीय  मुबई येथील नामांकित मेकअप आर्टिस्ट छाया जी मोरे यांचा पाचोरा येथे सोमवार दि. 10 एप्रिल   2023 रोजी  सकाळी 10 वाजता  सुरुवात होणार आहे. सेमिनार ठिकाण :-सुवर्णकार मंगल कार्यालय  प्रकाश टॉकीज जवळ देशमुख वाडी पाचोरा. आयोजक- भाग्यश्री मेकअप स्टुडिओ संचालिका भाग्यश्री सोनार व हिना शेख पाचोरा. सहकार्य - स्पर्श फोटो पाचोरा

ग्रामपंचायत मध्ये ही "स्विकृत ग्रामपंचायत सदस्य" नेमावे--- दिपक पवार यांची "ग्रामविकास मंत्री ना.गिरीष महाजन यांचे कडे केली मागणी"

Image
महानगरपालिका, नगरपालिका(नगरपंचायत)धर्तीवर ग्रामपंचायत मध्ये ही "स्विकृत ग्रामपंचायत सदस्य" नेमावे---पत्रकार दिपक पवार "ग्रामविकास मंत्री ना.गिरीष महाजन यांचे कडे केली मागणी" स्विकृत ग्रामपंचायत सदस्य चा विषय मंत्रिमंडळ बैठकीत ठेवणार--ना.गिरीष महाजन लोहारा ता पाचोरा--प्रतिनिधी--- शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या महानगरपालिका , नगरपालिका (नगरपंचायत)मध्ये ज्याप्रमाणे स्विकृत नगरसेवक शासनाच्या आदेशानुसार निवडले जातात. त्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेचा ग्रामीण भागातील महत्त्वाचा घटक असलेल्या "ग्रामपंचायत मध्ये' ही ग्रामपंचायत सदस्यांच्या संख्या बळानुसार "स्विकृत ग्रामपंचायत सदस्य" निवडले जावेत,अशी मागणी महाराष्ट्रातील युवा वर्गाच्या वतीने लोहारा येथील दै.दिव्यमराठी चे युवा पत्रकार दिपक पवार यांनी राज्याचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण युवक क्रीडा मंत्री ना. गिरीष महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शासनाने महानगरपालिका,नगरपालिका(नगरपंचायत)धर्तीवर स्विकृत ग्रामपंचायत सदस्य नेमण्याचा शासन निर्णय(जी.आर)त्वरित काढावा.व महारा...

वृंदावन हॉस्पिटल पाचोरा व ग्रामविकास समिती अंजनविहरे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आरोग्य दिना निमित्ताने मोफत आरोग्य तपासणी शिबिर.

Image
वृंदावन हॉस्पिटल पाचोरा व ग्रामविकास समिती अंजनविहरे यांच्या संयुक्त विद्यमाने* *जागतिक आरोग्य दिना निमित्ताने  मोफत आरोग्य तपासणी शिबिर.  शिबिराचे आयोजन ग्रामविकास समितीच्या माध्यमातून करण्यात आले.छ.शिवरायांचे प्रतिमा पूजन करून डॉ. निळकंठ पाटील यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला व  विविध आरोग्य योजना विषयी माहिती दिली.शिबिरास सुरवात केली.शिबीर साठी वेगवेगळ्या स्पेशालिस्ट डॉ उपलब्ध होते त्यामध्ये  ग्रामविकास समिती अंजनविहरे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य तपासणी व रोग निदान शिबिर किडनीस्टोन (मुतखडा),प्रोस्टेट ग्रंथी,हाडांचे आजार, लहान बाळांची तपासणी, बी.पी (ब्लडप्रेशर) ,शुगर,ईसीजी,तसेच मुळव्याद, भंगदर,यांची तपासणी केली .  श्री डॉ निळकंठ पाटील सर MBBS.D.Ortho(अस्थिरोग तज्ञ) डॉ भरत पाटील (MBBS,MD मेडीशीन) जनरल फीजीशन डॉ रोहन नाईक सर (MBBS,DCH बालरोग तज्ञ) डॉ प्रशांत महाराज सर (MBBS.DNB.युरोलोजिस्ट ) डॉ कल्पेश पाटील (मुळव्याध भंगदर तज्ञ) इ.डॉक्टरांची टीम या शिबिरासाठी मिळाली होती.

मूकबधिर निवासी विद्यालयाती विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी संपन्न.

Image
मूकबधिर निवासी विद्यालयाती विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी  आज दि.  06/04/2023 रोजी मूक बधिर निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सदर आरोग्य तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र वरखेडी येथील मेडिकल ऑफिसर डॉ शेखर डी पाटील व त्यांचे सहकारी डॉ अक्षय चक्के, डॉ उमेश भटकर, डॉ राहुल महाजन यांनी केली. सोबत आरोग्य सहाय्यक रमेश चौधरी व आरोग्य सेवक गजानन भाऊ यांचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक ईश्वर पाटील व ज्येष्ठ शिक्षक संजय पाटील शिक्षकेतर कर्मचारी शेनपडू तडवी, योगेश बडगुजर व विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. शेखर पाटील व त्यांच्या टीमचे आभार मुख्याध्यापक यांनी मानले.

डॉ. अंजली ठाकरे हिचा पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेतर्फे सत्कार...

Image
डॉ. अंजली ठाकरे हिचा पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेतर्फे सत्कार. पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री .गो .से.  हायस्कूल शाळेचे उपमुख्याध्यापक एन .आर. ठाकरे. व कला शिक्षिका सौ जे.एन ठाकरे यांची कन्या डॉ. अंजली ठाकरे ही वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथून एम.बी.बी.एस अंतिम वर्षाच्या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्याबद्दल संस्थेचे चेअरमन संजय वाघ. व्ह.चेअरमन व्ही.टी. जोशी. ज्येष्ठ संचालक सतीश चौधरी. संजय पाटील यांच्या कडून  सत्कार करण्यात आला. तिला पुढील भविष्यात हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

पाचोऱ्यात महावीर जयंती निमित्ताने शोभायात्रा उत्साहात.

Image
पाचोऱ्यात महावीर जयंती निमित्ताने शोभायात्रा उत्साहात. पाचोरा : प्रतिनिधी शहरात आज महावीर जयंती मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. जैन समाजातील विविध घटक एकत्रित येत त्यांनी महावीर जयंतीच्या या उत्सवात उत्साहाने सहभाग घेतला. शहरातील गांधी चौक समोरील जैन मंदिरा पासून  वासुपूज्य स्वामी जैन मंदिरात आज सकाळी जैन ध्वज वंदन करण्यात आले. त्यानंतर तेथून भव्य  शोभायात्रा काढण्यात आली. या यात्रेत बँड पथकासह समाजातील सर्व बंधू भगिनी सहभागी झाले होते. ही शोभायात्रा जैन मंदिरापासून जामनेर रोड स्टेशन रोड देशमुखवाडी मार्गे  आल्यानंतर तिचा समारोप जैन मंदिर येथे झाला. या वेळी ठाकरे गटाच्या नेत्या सौ वैशाली सूर्यवंशी यांनी भेट देत सर्व जैन समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या,

ग्राम विकास विद्यालय येथे पिंपळगाव हरेश्वर येथील आपदा मित्रांनी दिली आपत्ती बद्धल माहिती.

Image
ग्राम विकास विद्यालय येथे पिंपळगाव हरेश्वर येथील आपदा मित्रांनी दिली आपत्ती बद्धल माहिती. आज दि. 01/04/2023.रोजी पिंपळगाव हरेश्वर येथील ग्राम विकास विद्यालय व  कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय.येथे आपत्ती विषयावर माहिती देण्यात आली.यावेळी  आपदा मित्र शुभम नामदेव पाटील,वैभव शांतीलाल माहुरे,हर्षल बापू गीते.यांनी पूर,भूकंप, वीज, आग,या आपदावरती शालेय मुलांना माहिती दिली तसेच  आपदा किट याची माहिती दिली. येणारी घटना व झालेली घटना या विषयावर काय केलं पाहिजे यासाठी आपण काय उपाय योजना केल्या पाहिजे त्याची माहिती दिली,  आपल्या स्वतःचा संरक्षण आपण स्वतः  कसं करू शकतो  या विषयावर पूर्ण माहिती दिली. यावेळी ग्राम विकास विद्यालयातील मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद तसेच शाळेतील विध्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्तित होते.