Posts

पिंपळगाव हरेश्वर येथील असंख्य कार्यकर्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात सामील.

Image
  पिंपळगाव हरेश्वर येथील  असंख्य कार्यकर्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात सामील. पिंपळगाव हरेश्वर येथील विविध पक्षातील असंख्य कार्यकर्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पाचोरा येथे जम्बो पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.यावेळी  पक्षात आलेल्या तरुणांचे आभार वैशालीताई सूर्यवंशी यांनी मानले. यावेळी उपजिल्हा प्रमुख उद्धव भाऊ मराठे वैशालीताई सूर्यवंशी, दिलीप देशमुख, कोमलसिंग देशमुख,तालुका संघटक राहुल बडगुजर, भूषण कासार,उपतालुका संघटक समाधान हटकर पिंपळगाव संघटक भारत क्षिरसागर,शहर प्रमुख कलमेश भास्कर मालकर.उपतालुका प्रमुख अनिकेत जैन,शहर प्रमुख नांदा बडगुजर, उपशहर प्रमुख मुकेश न्हावी समाधान बडगुजर, सलीम कारागीर, यांच्या उपस्तित.  सुभाष मालकर, शरीफखा फकीर, मुकेश पाटील, शारुख तडवी, सलमानखान, गणेश पाटील, मंगेश पाटील, समाधान बडगुजर, शंकर मापाडी, शांताराम पाटील, सलीम तडवी, सुरेश पाटील, अविनाश गावंडे, महेंद्र गुजर, महेंद्र घाडघे, मनोज तेली, गोविंदा तेली, कैलास तेली, प्रमोद पाटील, ज्ञानेश्वर प...

नवनिर्माण बंजारा क्रांती सेनेच्या जळगाव युवा जिल्हा अध्यक्ष पदी सचिन महेश राठोड यांची निवड.

Image
नवनिर्माण बंजारा क्रांती सेनेच्या जळगाव  युवा जिल्हा अध्यक्ष पदी सचिन महेश राठोड यांची निवड. जळगाव  जिल्ह्या मधील  सुशिक्षित आणि समाज कार्यामध्ये लोकांच्या सुख दुःखा मध्ये धावून जाणारे निर्भिड वकृत्व करणारे युवकांच्या न्याय हक्कासाठी लढणारे  सचिन भाऊ राठोड यांना *नवनिर्माण बंजारा क्रांती सेनेचे संस्थापक संस्थापक  किरण भाऊ चव्हाण व राष्ट्रीय अध्यक्ष डॉ मुकेश भाऊ राठोड* यांनी मा श्री सचिन भाऊ राठोड यांची जळगाव खान्देश युवा जिल्हा अध्यक्ष पदी निवड केली आहे सचिन भाऊ राठोड यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक :- नवनिर्माण बंजारा क्रांती सेना भारत

अमोलभाऊ शिंदे 28 ऑक्टोबर,सोमवार रोजी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून करणार.

Image
अमोलभाऊ शिंदे 28 ऑक्टोबर,सोमवार रोजी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून करणार. पाचोरा-   येथील भारतीय जनता पार्टीचे विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी करण्याची घोषणा केली असून विधानसभा निवडणूक लढण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.मागील विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करून अत्यंत कमी मताने पराभूत झालेले अमोल शिंदे यांनी मागील विधानसभा निवडणुकीनंतर गेल्या पाच वर्षापासून न थांबता सतत मतदारसंघातील जनतेच्या सुख-दुःखात उभे राहत आपला जनसंपर्क अजून जोमाने वाढवला आहे.          मागील विधानसभा निवडणुकीत जनतेने दिलेले आशीर्वाद,प्रेम आणि दाखविलेला विश्वासावर मी जवळपास 75 हजार मते मिळवू शकलो आणि यावेळी देखील जनतेतून मिळणारा प्रतिसाद बघता आणि त्यांच्या भावना लक्षात घेता मी जनतेचा उमेदवार म्हणून दिनांक 28 ऑक्टोबर 2024 सोमवार रोजी माझा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. तरी मोठ्या संख्येने मला आशीर्वाद व पाठिंबा देण्यासाठी पाचोरा-भडगाव मतदार संघातील जनतेने उपस्थित रहावे असे अमोल शिंदे यांनी आवाहन केले आहे.

श्री समर्थ गोविद महाराज समाधी सोहळा यास 200 वे वर्षांमध्ये पदापर्ण होत आहे त्या निमीत्त संकलपीत वार्षिक सोहळ्यातील प्रथम श्रीमद भागवत कथा सोहळा.

Image
श्री समर्थ गोविद महाराज समाधी सोहळा यास 200 वे वर्षांमध्ये पदापर्ण होत आहे त्या निमीत्त संकलपीत वार्षिक सोहळ्यातील प्रथम श्रीमद भागवत कथा सोहळा.               कार्यकारी संपादक :- गायत्री क्षिरसागर आश्चिन पोर्णिमा दि. १७/१०/२०२४ ते आश्विन सप्तमी दि. २३/१०/२०२४ पर्यंत आयोजित केला आहे.  या कथेचे  आयोजक  श्री समर्थ गोविंद महाराज मंदिर संस्थान, पिंपळगांव हरेश्वर यांच्या तर्फे करण्यात आलेले आहे. कार्यक्रमाची वेळ.रोज रात्री ८ ते ११ या वेळेत कथा होईल तरी पंचक्रोषीतील भाविकांनी या कथेचा लाभ घ्यावा ही विनंती. कथाव्यास पुज्या दीदी, ममता श्री.जी. व्यास (बावीसे) खान्देश मीरा भागवत भुषण व्यासपीठाधीश्वरी व्यास नगरी यावल महाराष्ट्र. संपर्क :- ज्या भाविकांना आई-वडिलांच्या स्मरणार्थ कथेत सहभाग नोंदवायचा असेल किंवा आर्थिक मदत दान करायची असेल त्यानी खालील नंबर वर संपर्क साधावा- मो. 8149334245/9423769869/7588011314 कथेचे ठिकाण:-श्री.समर्थ गोविंद महाराज मंदिर पिंपळगाव हरेश्वर. स्वागतोस्तुक:-संस्थान सर्व संचालक मंडळ व ग्रामस्थ मंडळी पिंपळगाव हरेश्व...

दिपलक्ष मराठी न्यूज च्या बातमीची तसेच शालिकराम मालकर सह व गावातील शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन तहसीलदार साहेब यांनी उद्या सकाळी तात्काळ रस्त्याचा पंचनामा करण्याच्या दिल्या सूचना.

Image
दिपलक्ष मराठी न्यूज च्या बातमीची तसेच शालिकराम मालकर सह व गावातील शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन तहसीलदार साहेब यांनी उद्या  सकाळी तात्काळ रस्त्याचा पंचनामा करण्याच्या दिल्या सूचना. काल दि.13/10/2024 रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे पिंपळगाव हरेश्वर येथील डुब्बा धरणावरील रस्ता वाहून गेला होता त्याची दखल घेऊन शालिकराम मालकर तसेच गावातील शेतकरी यांनी रस्ता दुरुस्त व्हावा अशी मागणी माननीय तहसील दार साहेब यांना केली होती तसेच फोन द्वारे शालिकराम मालकर यांनी तात्काळ तहसीलदार साहेब यांच्या सोबत बोलणं करून लवकरात लवकर पंचनामे करून रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी केली होती. त्या अनुषंगाने तहसीलदार यांनी लगेच संबंधित कार्यालयाला पत्रव्यवहार करून उद्या सकाळी पंचनामे करावे असे सांगितले.. पत्र पुढील प्रमाणे आहे... महाराष्ट्र शासन  महसुल व वनविभाग तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांचे कार्यालय, पाचोरा टेलिफोन नं. 02596-240611 Email Id:- tahasilpachora@gmail.com क्रमांक/दंडप्र/कावि/652/2024 प्रति, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग पाचोरा. दिनांक 14/10/2024 विषयः- कालच्या अवकाळी प...

आज पिंपळगाव हरेश्वर येथे विठ्ठल मंदिर येथून श्री.समर्थ गोविंद महाराज मूर्ती मिरवणूक दुपारी एक वाजता.

Image
कार्यकारी संपादक :- गायत्री क्षिरसागर  आज पिंपळगाव हरेश्वर येथे विठ्ठल मंदिर येथून  श्री.समर्थ गोविंद महाराज मूर्ती मिरवणूक दुपारी एक वाजता. पिंपळगाव हरेश्वर येथे 200 वर्षानंतर गोविंद महाराजांची मूर्ती स्थापन होतेय. श्री. विठ्ठल मंदिर संस्थान, पिंपळगाव (हरेश्वर) ता.पाचोरा जि. जळगाव येथे श्री. समर्थ गोविंद महाराज यांच्या मुर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा निमंत्रण शके १९४६ अश्विन शु.।। एकादशी दिनाँक १४ / १० / २०२४ सोमवार रोजी दुपारी १२.०० वाजता श्री समर्थ गोविंद महाराज यांच्या मूर्तीची मिरवणूक. * प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रम * शके १९४६ अश्विन शु.।। चतुर्दशी बुधवार दि.१६ /१०/२०२४ पासुन श्री विष्णूयाग प्रारंभ * शके १९४६ अश्विन शु।। १५ गुरुवार दि.१७/१०/२०२४ रोजी देवता स्थापना, हवन, स्नपन विधी शके १९४६ अश्विन व. ।। प्रतिपदा शुकवार दि. १८/१०/२०२४ रोजी सकाळी १० वाजता श्री. समर्थ गोविंद महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा नंतर पुर्णाहूती व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होईल तरी वरिल सर्व कार्यक्रमांचा आपण लाभ घ्यावा ही विनंती. आयोजन :-श्री विठ्ठल मंदिर संस्थान पिंपळगाव (हरेश्व...

ग्राम विकास विद्यालयाच्या दोन शिक्षकांना सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक मिळाला.

Image
ग्राम विकास विद्यालयाच्या शिक्षकांना सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक मिळाला. उपसंपदाक :-चंद्रकांत माहोर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती चे औचित्य साधून आज दिनांक 6/10/2024 रोजी नैसर्गिक मानव अधिकार सुरक्षा परिषद फोरम यांचे तर्फे   "सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक पुरस्कार" प्रदान करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी बहुमोल कार्य करून त्यांची शिक्षणात रुची वाढवल्याबद्दल, सामाजिक उपक्रम तळागळापर्यंत प्रभावी पणे राबवण्याचा पर्यंत केल्याबद्दल, निसर्गावर प्रेम करणारे,विद्यार्थी प्रिय शिक्षक म्ह्णून ओळख असणारे ग्राम विकास विद्यालय पिंपळगाव हरेश्वर  तालुका पाचोरा चे उपप्राचार्य  श्री पी ओ चौधरी सर व माध्यमिक शिक्षक श्री उल्हास पाटील सर  यांना हे पुरस्कार " प्रदान करण्यात आले हा सोहळा  धुळे येथील कंकारिया भवन येथे पार पाडला .महाराष्ट्रातुन 140 शिक्षकांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते त्यांनी हे पुरस्कार सप्तनिक स्वीकारले.शिक्षक श्री उल्हास पाटील सर  यां...

पिंपळगाव हरेश्वर येथे जगाचा पोशिंदा बळीराजा मेळावा संपन्न.

Image
पिंपळगाव हरेश्वर येथे जगाचा  पोशिंदा बळीराजा मेळावा संपन्न.  शेतकरी स्वावलंबी तर देश स्वावलंबी दिनांक: 04/10/2024 शुक्रवार रोजी,पिंपळगाव (हरे.)ता.पाचोरा     येथे मेळावा आयोजित करण्यात आला.  कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.श्री. शामकांत पाटील (आदर्श शेतकरी ) आंबे वडगाव  कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री किशोरजी शिनकर .प्रमुख वक्ते: श्री. सहकार महर्षी श्री. उत्तम दादा थोरात रा.स्व. संघाचे जेष्ठ स्वयंसेवक, यांनी आजच्या शेतकर्याने शेती साठी 4M समजून घेण्याची आहे प्रकर्षाने लक्षात आणुन दिले, (4 M फोर एम ), 1M) मनी पावर ( आर्थिक व्यस्थापन ) M2) मँन पवार (मनुष्य बळ M3) मँनेजमेट (व्यवस्थापन M4)मार्केट (बाजारपेठ) इ. विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.शेतकरी आत्मनिर्भर व स्वावलंबी कसा बनेल तसेच  स्वातंत्र्य नंतर राज्य करत्यांनी शेतकऱ्यांना चुकीच्या सवयी लावल्या व चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जात गेला.या मधुन बाहेर निघण्यासाठी नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती ,विषमुक्त शेती गौ आधारित शेती केली तर खर्चात बचत होवुन उत्पन्नात वाढ होईल  यासाठी मार्गदर्शन केले. डॉ....

तार चोरीच्या गुन्ह्यातील तीन संशयित आरोपी पहूर पोलीस स्टेशनला जेरबंद.

Image
तार चोरीच्या गुन्ह्यातील तीन संशयित आरोपी पहूर पोलीस स्टेशनला जेरबंद. पहूर , ता . जामनेर ( ता . ३ ) परिसरातील शेत शिवारात  वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर  पोलिसांनी आज तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली .           गेल्या १५ दिवसांमध्ये चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे . या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर , उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे , पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली गस्तीपथक स्थापन करण्यात आले आहे .        गस्तीवर असताना फिरोज खाटीक ,  इरफान शेख ,  फातिम शेख ( रा . मदनी नगर  , जामनेर  ) हे संशयास्पद रित्या आढळून आले . यांना अटक करून त्यांच्या जवळील साडेसात हजार रुपयांची रोकड व लोखंडी टॅमी जप्त केली . याप्रकरणी पहूर पोलीसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे . गस्तीपथकात दीपक सुरवाडे  , विनोद पाटील , ज्ञानेश्वर ठाकरे , राहूल पाटील , अमोल पाटील  , गोपाळ गायकवाड यांचा समावेश होता .

आर .टी .लेले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना जयंतीदिनी अभिवादन !

Image
आर .टी .लेले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना जयंतीदिनी अभिवादन ! पहूर , ता . जामनेर ( ता . ३ ) पहुर गृप  एज्युकेशन सोसायटी संचलीत आर. टी. लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात  आज राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच जय जवान, जय किसान नारा देणारे स्वातंत्रसेनानी, भारतरत्न लाल बहादुरशास्त्री यांची जयंती व आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन व स्वच्छता दिन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक  एस. आर.सोनवणे यांनी भूषवले . याप्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक. एम.एस. आगारे, संस्था प्रतिनिधी तसेच वरीष्ठ लिपीक किशोर पाटील ,  ज्येष्ठ शिक्षक व्ही.व्ही. बोरसे,  एस. एस. पाटील  ,   जी. व्ही. थोरात, जेष्ठ शिक्षीका श्रीमती भालेराव . कनिष्ठ लिपीक  शरद पाटील ,  तसेच शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थीत होते. याप्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी भाषणे केली. श्रीमती जे. एफ. चौधरी  यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच उत्कृष्ट भाषण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण...

एस. एस. एम. एम. महाविद्यालयात गांधी जयंती निमित्त स्वच्छता मोहिम.

एस. एस. एम. एम. महाविद्यालयात गांधी जयंती निमित्त स्वच्छता मोहिम. *पाचोरा दि. 02 -* पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग, भारत सरकारचा My Bharat युवा कार्यक्रम विभाग, नेहरू युवा केंद्र जळगाव, डॉ. वाय. पी. युवा फाऊंडेशन एन. जी. ओ., साईनाथ सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय, खडकदेवळा बु.|| यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता पंधरवाड्याचे औचित्य साधून स्वच्छता मोहिमेचे शिबिर राबवण्यात आले. यावेळी स्वयंसेवकांनी महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ करत स्वच्छतेचा संदेश दिला. त्यासोबत स्वयंसेवकांना स्वच्छता शपथ देखील देण्यात आली. संस्थेचे व्हा. चेअरमन मा. श्री. नानासाहेब व्ही. टी. जोशी व उपप्राचार्य मा. डॉ. वासुदेव वले यांच्या शुभहस्ते गांधीजी व लालबहादूर शास्त्रींच्या प्रतिमेचे पूजन करून स्वच्छता मोहिमेची सुरुवात झाली. यावेळी डॉ. जे. डी. गोपाळ, डॉ. के. एस. इंगळे, डॉ. एस. बी. तडवी, डॉ. वाय. बी. पुरी, प्रा. आर. बी. वळवी, डॉ. यशवं...