तार चोरीच्या गुन्ह्यातील तीन संशयित आरोपी पहूर पोलीस स्टेशनला जेरबंद.

तार चोरीच्या गुन्ह्यातील तीन संशयित आरोपी पहूर पोलीस स्टेशनला जेरबंद.


पहूर , ता . जामनेर ( ता . ३ ) परिसरातील शेत शिवारात  वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर  पोलिसांनी आज तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली .
          गेल्या १५ दिवसांमध्ये चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे . या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर , उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे , पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली गस्तीपथक स्थापन करण्यात आले आहे .
       गस्तीवर असताना फिरोज खाटीक ,  इरफान शेख ,  फातिम शेख ( रा . मदनी नगर  , जामनेर  ) हे संशयास्पद रित्या आढळून आले . यांना अटक करून त्यांच्या जवळील साडेसात हजार रुपयांची रोकड व लोखंडी टॅमी जप्त केली . याप्रकरणी पहूर पोलीसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे . गस्तीपथकात दीपक सुरवाडे  , विनोद पाटील , ज्ञानेश्वर ठाकरे , राहूल पाटील , अमोल पाटील  , गोपाळ गायकवाड यांचा समावेश होता .

Comments

Popular posts from this blog

अट्टल पिकअप गाडी चोर पिंपळगाव हरेश्वर पोलिसांच्या ताब्यात...पोलिसांची मोठी कामगिरी..

पोलीस बनून गेला बहिणीला कॉफी पुरवण्यासाठी भाऊ अन बिंग फुटले; पोलिसात गुन्हा दाखल.

लेखणीचा शिलेदार देतो शेतकरी अवजारांना धार-सुनील लोहार.