ग्राम विकास विद्यालयाच्या दोन शिक्षकांना सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक मिळाला.



ग्राम विकास विद्यालयाच्या शिक्षकांना सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक मिळाला.
उपसंपदाक :-चंद्रकांत माहोर

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती चे औचित्य साधून आज दिनांक 6/10/2024 रोजी नैसर्गिक मानव अधिकार सुरक्षा परिषद फोरम यांचे तर्फे   "सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक पुरस्कार" प्रदान करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी बहुमोल कार्य करून त्यांची शिक्षणात रुची वाढवल्याबद्दल, सामाजिक उपक्रम तळागळापर्यंत प्रभावी पणे राबवण्याचा पर्यंत केल्याबद्दल, निसर्गावर प्रेम करणारे,विद्यार्थी प्रिय शिक्षक म्ह्णून ओळख असणारे ग्राम विकास विद्यालय पिंपळगाव हरेश्वर  तालुका पाचोरा चे उपप्राचार्य  श्री पी ओ चौधरी सर व माध्यमिक शिक्षक श्री उल्हास पाटील सर  यांना हे पुरस्कार " प्रदान करण्यात आले हा सोहळा  धुळे येथील कंकारिया भवन येथे पार पाडला .महाराष्ट्रातुन 140 शिक्षकांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते त्यांनी हे पुरस्कार सप्तनिक स्वीकारले.शिक्षक श्री उल्हास पाटील सर  यांनी कोरोना काळात ग्राम विकास विद्यालयातील बरेच शी झाडे जगवली होती.
त्याबद्दल ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष प्रकाश बाजीराव पाटील, ग्राम विकास मंडळाचे सर्व संचालक मंडळ 
ग्राम विकास विद्यालयाचे मुख्याध्यापक  पी जि. तेली सर तसेच  सर्व शिक्षक वृंद कर्मचारी, आणि ग्रामस्थ यांनी शुभेच्छा दिल्या..

Comments

Popular posts from this blog

अट्टल पिकअप गाडी चोर पिंपळगाव हरेश्वर पोलिसांच्या ताब्यात...पोलिसांची मोठी कामगिरी..

पोलीस बनून गेला बहिणीला कॉफी पुरवण्यासाठी भाऊ अन बिंग फुटले; पोलिसात गुन्हा दाखल.

लेखणीचा शिलेदार देतो शेतकरी अवजारांना धार-सुनील लोहार.