दिपलक्ष मराठी न्यूज च्या बातमीची तसेच शालिकराम मालकर सह व गावातील शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन तहसीलदार साहेब यांनी उद्या सकाळी तात्काळ रस्त्याचा पंचनामा करण्याच्या दिल्या सूचना.
दिपलक्ष मराठी न्यूज च्या बातमीची तसेच शालिकराम मालकर सह व गावातील शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन तहसीलदार साहेब यांनी उद्या सकाळी तात्काळ रस्त्याचा पंचनामा करण्याच्या दिल्या सूचना.
काल दि.13/10/2024 रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे पिंपळगाव हरेश्वर येथील डुब्बा धरणावरील रस्ता वाहून गेला होता त्याची दखल घेऊन शालिकराम मालकर तसेच गावातील शेतकरी यांनी रस्ता दुरुस्त व्हावा अशी मागणी माननीय तहसील दार साहेब यांना केली होती तसेच फोन द्वारे शालिकराम मालकर यांनी तात्काळ तहसीलदार साहेब यांच्या सोबत बोलणं करून लवकरात लवकर पंचनामे करून रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी केली होती. त्या अनुषंगाने तहसीलदार यांनी लगेच संबंधित कार्यालयाला पत्रव्यवहार करून उद्या सकाळी पंचनामे करावे असे सांगितले..
पत्र पुढील प्रमाणे आहे...
महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग
तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांचे कार्यालय, पाचोरा टेलिफोन नं. 02596-240611 Email Id:- tahasilpachora@gmail.com क्रमांक/दंडप्र/कावि/652/2024
प्रति,
उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग पाचोरा.
दिनांक 14/10/2024
विषयः- कालच्या अवकाळी पावसाने पिंपळगांव हरेश्वर ते जरंडी रस्ता व्हाया घोडसगांव धरण रस्ता उखडुन गेल्या बाबत.
उपरोक्त संदर्भिय विषयान्वये आपणास कळविण्यात येते की, मौजे पिंपळगांव हरेश्वर ते जरंडी रस्ता व्हाया गॉडसगांव धरण रस्ता कालरोजीच्या झालेल्या अवकाळी पावसाने उखडून गेला असल्याने शेतकरी यांना शेतात ये- जा करण्यासाठी अडचण झाल्याबाबत शेतकरी यांच्या तक्रारी इकडील कार्यालयास प्राप्त झालेल्या आहेत.
त्याअनुषंगाने आपण सदर रस्त्याची तात्काळ पाहणी करुन रस्ता दुरुस्त करण्यात यावा जेणेकरुन शेतकरी यांना शेतातील मालाची रस्त्याने वाहतुक करण्यासाठी भविष्यात शेतकऱ्यांच्या तक्रारी येणार नाही याची काळजी
घावी. सदर रस्ता दुरुस्तीचे काम तात्काळ करण्यात यावे.
तहसिलदार
कार्यकारी दंडाधिकारी पाचोरा
Comments
Post a Comment