एस. एस. एम. एम. महाविद्यालयात गांधी जयंती निमित्त स्वच्छता मोहिम.

एस. एस. एम. एम. महाविद्यालयात गांधी जयंती निमित्त स्वच्छता मोहिम.

*पाचोरा दि. 02 -* पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग, भारत सरकारचा My Bharat युवा कार्यक्रम विभाग, नेहरू युवा केंद्र जळगाव, डॉ. वाय. पी. युवा फाऊंडेशन एन. जी. ओ., साईनाथ सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय, खडकदेवळा बु.|| यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता पंधरवाड्याचे औचित्य साधून स्वच्छता मोहिमेचे शिबिर राबवण्यात आले. यावेळी स्वयंसेवकांनी महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ करत स्वच्छतेचा संदेश दिला. त्यासोबत स्वयंसेवकांना स्वच्छता शपथ देखील देण्यात आली.
संस्थेचे व्हा. चेअरमन मा. श्री. नानासाहेब व्ही. टी. जोशी व उपप्राचार्य मा. डॉ. वासुदेव वले यांच्या शुभहस्ते गांधीजी व लालबहादूर शास्त्रींच्या प्रतिमेचे पूजन करून स्वच्छता मोहिमेची सुरुवात झाली.
यावेळी डॉ. जे. डी. गोपाळ, डॉ. के. एस. इंगळे, डॉ. एस. बी. तडवी, डॉ. वाय. बी. पुरी, प्रा. आर. बी. वळवी, डॉ. यशवंत पाटील, डॉ. क्रांती सोनवणे, प्रा. अतुल पाटील, डॉ. शरद पाटील, डॉ. माणिक पाटील, प्रा. स्वप्नील भोसले, श्री. देवचंद गायकवाड, श्री. विश्वास पाटील, श्री. संजय निकम, श्री. हर्षवर्धन पाटील, श्री. सुनील नवगिरे व स्वयंसेवक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

अट्टल पिकअप गाडी चोर पिंपळगाव हरेश्वर पोलिसांच्या ताब्यात...पोलिसांची मोठी कामगिरी..

पोलीस बनून गेला बहिणीला कॉफी पुरवण्यासाठी भाऊ अन बिंग फुटले; पोलिसात गुन्हा दाखल.

लेखणीचा शिलेदार देतो शेतकरी अवजारांना धार-सुनील लोहार.