आर .टी .लेले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना जयंतीदिनी अभिवादन !
आर .टी .लेले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना जयंतीदिनी अभिवादन !
पहूर , ता . जामनेर ( ता . ३ ) पहुर गृप एज्युकेशन सोसायटी संचलीत आर. टी. लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आज राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच जय जवान, जय किसान नारा देणारे स्वातंत्रसेनानी, भारतरत्न लाल बहादुरशास्त्री यांची जयंती व आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन व स्वच्छता दिन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक एस. आर.सोनवणे यांनी भूषवले . याप्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक. एम.एस. आगारे, संस्था प्रतिनिधी तसेच वरीष्ठ लिपीक किशोर पाटील , ज्येष्ठ शिक्षक व्ही.व्ही. बोरसे, एस. एस. पाटील , जी. व्ही. थोरात, जेष्ठ शिक्षीका श्रीमती भालेराव . कनिष्ठ लिपीक शरद पाटील , तसेच शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थीत होते. याप्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी भाषणे केली. श्रीमती जे. एफ. चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच उत्कृष्ट भाषण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.आपल्या अध्यक्षीय भाषणात एस. आर. सोनवणे सर यांनी महात्मा गांधीजी व लाल बहादुर शास्त्रीजी यांचे देशासाठी योगदान व महत्व स्पष्ट केले. शाळेत स्वच्छता अभियान राबवून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. डी. सुरवाडकर यांनी केले .
Comments
Post a Comment