अमोलभाऊ शिंदे 28 ऑक्टोबर,सोमवार रोजी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून करणार.

अमोलभाऊ शिंदे 28 ऑक्टोबर,सोमवार रोजी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून करणार.
पाचोरा-   येथील भारतीय जनता पार्टीचे विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी करण्याची घोषणा केली असून विधानसभा निवडणूक लढण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.मागील विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करून अत्यंत कमी मताने पराभूत झालेले अमोल शिंदे यांनी मागील विधानसभा निवडणुकीनंतर गेल्या पाच वर्षापासून न थांबता सतत मतदारसंघातील जनतेच्या सुख-दुःखात उभे राहत आपला जनसंपर्क अजून जोमाने वाढवला आहे.
         मागील विधानसभा निवडणुकीत जनतेने दिलेले आशीर्वाद,प्रेम आणि दाखविलेला विश्वासावर मी जवळपास 75 हजार मते मिळवू शकलो आणि यावेळी देखील जनतेतून मिळणारा प्रतिसाद बघता आणि त्यांच्या भावना लक्षात घेता मी जनतेचा उमेदवार म्हणून दिनांक 28 ऑक्टोबर 2024 सोमवार रोजी माझा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. तरी मोठ्या संख्येने मला आशीर्वाद व पाठिंबा देण्यासाठी पाचोरा-भडगाव मतदार संघातील जनतेने उपस्थित रहावे असे अमोल शिंदे यांनी आवाहन केले आहे.




Comments

Popular posts from this blog

अट्टल पिकअप गाडी चोर पिंपळगाव हरेश्वर पोलिसांच्या ताब्यात...पोलिसांची मोठी कामगिरी..

पोलीस बनून गेला बहिणीला कॉफी पुरवण्यासाठी भाऊ अन बिंग फुटले; पोलिसात गुन्हा दाखल.

लेखणीचा शिलेदार देतो शेतकरी अवजारांना धार-सुनील लोहार.