जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्धल पिंपळगाव पोलीस स्टेशनच्या टीमचा सत्कार.


जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्धल पिंपळगाव पोलीस स्टेशनच्या टीमचा सत्कार. 

पिंपळगाव हरे. ता.पाचोरा वार्ताहार.
पाचोरा तालुक्यातील पिंपळगांव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील शेवाळे ता. पाचोरा येथील जनाबाई महारु पाटील यांच्या खून प्रकरणी 24 तासाच्या आत तपास लावून आरोपी साहिल मुकद्दर तडवी राजेश अनिल हातांगळे राकेश बळीराम हातांगळे रा. शेवाळे तालुका पाचोरा या तिन्ही आरोपींना तात्काळ ताब्यात घेऊन अटक करण्यात आली होती. त्यामुळे कुणाचा गुन्हा नंबर १५१२०२५ कलम नं.१०३ अन्वये दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्याचे तपासात, मा. पोलीस अधिक्षक सो। श्री महेश्वर रेड्डी, मा. अप्पर पोलीस अधिक्षक चाळीसगांव भाग श्रीमती कविता नेरकर, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री धनंजय येरुळे यांचे मार्गदर्शनाखाली मा. स.पो.निरी.सो। श्री प्रकाश काळे यांनी सदर गुन्ह्याचे तपासकामी पो.उप.निरी./श्री सर्जेराव क्षीरसागर, उपनिरीक्षक विठ्ठल पवार पो.हे.कॉ./१३६० अभिजीत निकम, पो.कॉ./२४४४ अमोल पाटील,  पो.कॉ./१७३६ ईमरान पठाण पोलीस कॉन्स्टेबल नामदेव इंगळे पोलीस कॉन्स्टेबल मुकेश तडवी असे पथक तयार करुन सदरचा गुन्ह्या ऊघडकिस आणणेबाबत सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक सो जळगाव यांनी सदर कामगिरीची दखल घेऊन आज रोजी पिंपळगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे, पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार, पोहेका /१३६० नरेंद्र नरवाडे, पोलीस कॉन्स्टेबल/२४४४ अमोल पाटील पोलीस कॉन्स्टेबल/१७३६ इम्रान पठाण पोकाँ नामदेव इगळे पोलीस हेडकॉन्स्टेबल अभिजीत निकम पोलीस कॉन्स्टेबल मुकेश तडवी यांचा माननीय पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या हस्ते प्रशासकीय पत्र देऊन सत्कार करण्यात आला आहे.

मुख्य संपादक:-दिपक मूलमुले मो.न. 9595470800

Comments

Popular posts from this blog

चिकन, मटण शॉप, कत्तलखाने बंद; गॊमांस कत्तल व विक्री करत असतांना आढळ्यास होणार कार्यवाही, पिंपळगाव पोलीस स्टेशन तर्फे मोठा निर्णय.

पिंपळगाव हरेश्वरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा संपन्न.

पिंपळगाव हरे -शिंदाड गटातून जिल्हा परीषद साठी कॉग्रेसपक्षा तर्फे श्वेता सीमा विनोद पाटील यांची उमेदवारी जाहीर.