पहूरला सावित्रीबाई फुले विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी.
पहूरला सावित्रीबाई फुले विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी.
विद्यार्थिनींनी साकारलेल्या 'क्लास मॅक्झिन 'चे प्रकाशन.
पहूर , ता . जामनेर ( ता . २ ) अहिंसेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि स्वतंत्र भारताचे द्वितीय पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती पहुर येथे उत्साहात साजरी करण्यात आली .
महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली घोंगडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले .
दहावीच्या विद्यार्थ्यांनी 'रघुपती राघव राजाराम पतित पावन सिताराम 'गीत सादर केले .
हर्षल राऊत , दिव्या जोशी , पलक जोशी , गौरव गव्हाळे , देवेश सोनवणे , वैष्णवी किटे , कोमल मोहने , जयश्री दांडगे , पलक जोशी , नंदिनी लहासे , आदी विद्यार्थिनी महापुरुषांच्या जीवनावर विचार मांडले .
हरिभाऊ राऊत , अमोल बाविस्कर , प्रणिता बोदडे यांनी मार्गदर्शन केले .सूत्रसंचालन गायत्री जवखेडे , तडवी यांनी केले . सांस्कृतिक प्रतिनिधी शंकर भामेरे यांनी आभार मानले . यावेळी पर्यवेक्षिका कल्पना बनकर , ज्येष्ठ शिक्षिका मधुर माधुरी बारी यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .यावेळी नेहरू युवा केंद्र , जळगाव यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसराची स्वच्छता केली .
*'क्लास मॅक्झिन ' चे प्रकाशन*
महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावर आधारित सातवीच्या रिया सटाले हिने संपादित केलेल्या 'क्लास मॅक्झिन ' चे मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली घोंगडे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले . कल्याणी गोरे , अंकिता पाटील , लावण्या पाटील , ईशा पाटील , मधुरा सटाले आदी विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला . कथा , कविता , चित्र , प्रश्नमंजुषा आदी घटकांचा 'मॅक्झिम ' मध्ये समावेश असून त्यांना इंग्रजी विषय शिक्षक शंकर भामेरे यांचे मार्गदर्शन लाभले .
Comments
Post a Comment