मूकबधिर निवासी विद्यालय पिंपळगाव हरे येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा.
मूकबधिर निवासी विद्यालय पिंपळगाव हरे येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा.
आज दि.१५ ऑगस्ट २०२४ गुरुवार रोजी दिव्यांगांच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या आपल्या *माजी विद्यार्थी संघ संचलित, मूकबधिर निवासी विद्यालयात स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा करण्यात आला.
गेल्या आठवड्यापासून विद्यालयात विद्यार्थ्यांच्या चित्रकला , रांगोळी , मैदानी खेळ,नृत्य अशा विविध स्पर्धांचे आयोजन व नशा मुक्त भारत नशा मुक्ती कार्यक्रम वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अतिशय आनंदाने उत्साहत देशभक्तीने प्रेरित होऊन महोत्सव विद्यालयात साजरा करण्यात आला.
घर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत नागरिकांमध्ये देशभक्ती निर्माण व्हावी राष्ट्रध्वजाबद्दल जागरूकता निर्माण व्हावी हा मुख्य उद्देश होता. आज 15 ऑगस्ट 2024 रोजी विद्यालयातील झेंडावंदन मा.डॉ. श्री. रवींद्रनाथ नारायण खैरनार (CA) संचालक - आर.एन. खैरनार अँड कंपनी चार्टर्ड अकौंटटंस, जळगाव यांचे शुभहस्ते संपन्न झाला.
सदर प्रसंगी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कवायतीचे सादरीकरण केले. कवायतीचे सूत्रसंचालन नितीन पाटील यांनी केले. तसेच मागील वर्षी प्रथम क्रमांकाने पास झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले इ.१ली. प्रथम - शेख आयान शेख जुबेर द्वितीय - सार्थक विष्णू जंजाळ इयत्ता २ री प्रथम - गजानन रमेश मगर द्वितीय - चि. ओम जाधव, इ.३ री. प्रथम - चि. रामधन माहेर द्वितीय- निसार शकनूर तडवी इ.४ थी. प्रथम- चि. अनिल प्रकाश भिल्ल ,द्वितीय- भावेश संजय माळी या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश पारस बिनशेती पतसंस्था शेंदुर्णीचे चेअरमन शांतीलाल भाऊ जैन व संचालक मंडळ तसेच पतसंस्थेचे मॅनेजर शिवदास महाजन व कर्मचारी यांच्या हस्ते पारस पतसंस्थेकडून देण्यात आले.
सदर कार्यक्रम प्रसंगी माजी सैनिक भगवान पाटील, छोटू सोनवणे. शामराव कृष्णा महाजन अध्यक्ष गोविंद मंदिर संस्थान पत्रकार- राजू ठाकूर, दीपक मुलमुले, चंद्रकांत माहूर. ग्रामस्थ - विठ्ठल नारायण गीते, ईश्वर पाटील, देविदास सांडू पाटील, रघुनाथ पाटील, विठ्ठल रामदास गीते, ईश्वर गिते, वसंत माळी गुरुजी, रमेश उबाळे, महिला मंडळ सौ कोकिळा पाटील, वंदना पाटील, नंदा पाटील, स्वाती पाटील, सविता गिते, कल्पना गीते, प्रतिभा गीते, रोशनी बडगुजर, शोभा पाटील, प्रमिला गायकवाड तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष पी.बी.पाटील साहेब, सचिव रा .ब. पाठक सर, सहसचिव संजय पाटील सर , संचालक रुपेश बडगुजर, विठ्ठल बडगुजर , सुरेश बापू बडगुजर, अमरसिंग देशमुख. विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक विश्वनाथ चौधरी, विद्यालयाचे मुख्याध्यापक ईश्वर पाटील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. सदर प्रसंगी मान्यवरांनी आणलेला खाऊ व फळांचे वाटप दिव्यांग विद्यार्थ्यांना करण्यात आला. सालाबादाप्रमाणे राजेंद्रभाऊ काशिनाथ कानडे वरखेडी यांचे परिवाराकडून विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांना निष्ठांना भोजन देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद महाजन यांनी केले. आलेल्या पाहुण्यांचे आभार विद्यालयाचे मुख्याध्यापक ईश्वर पाटील यांनी मानले सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment