उषःकाल प्रतिष्ठान संचलित द लॉर्ड इंटरनॅशनल स्कूल* पिंपळगाव हरेश्वर येथे 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
उषःकाल प्रतिष्ठान संचलित द लॉर्ड इंटरनॅशनल स्कूल पिंपळगाव हरेश्वर येथे 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
ग्राम विकास मंडळाचे माजी अध्यक्ष आप्पासो श्री देविदास रामदास महाजन* यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ग्राम विकास मंडळाचे माजी चिटणीस दादासो रवींद्र श्रीपत जाधव, माजी संचालक भाऊसो मौजूलाल राजूलाल जैन, तात्यासो श्री मिलिंद दत्तात्रय देव, भाऊसो श्री प्रदीप वामन पवार, ग्राम विकास विद्यालयाचे माजी प्राचार्य अण्णासो श्री भागवत रामदास महाजन तसेच गावातील मान्यवर श्री त्रंबक काका कुंभार, श्री ठाकूर काका, डॉ श्री सुरेश गेंदिलाल तेली,श्री पांडुरंग तात्या पाटील,श्री नरेंद्र चुन्नीलाल ठाकूर, श्री धनराज मदने, सौ नंदाताई सिताराम पाटील, इंजी कल्पेश शांतीलाल तेली, डॉक्टर अल्केश शांतीलाल तेली तसेच विद्यार्थ्यांचे पालक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
शाळेतील बाळ गोपाळ यांचे विविध कला गुणांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.उपस्थितांना श्री भागवत रामदास महाजन प्राचार्य यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त मनोगत व्यक्त केले तसेच *सौ नंदा पाटील यांनी सुद्धा विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीमती डी एस पवार मॅडम, श्रीमती एम एस पवार मॅडम, श्रीमती पी यू चव्हाण मॅडम,मदतनिस सौ ए एस ढाकरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांचे व पालकांचे आभार उष:काल प्रतिष्ठान चे अध्यक्ष दादासो श्री डॉक्टर शांतीलाल तेली यांनी मानले.
Comments
Post a Comment